रात्री दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
दीर्घकाळ निरोगी आणि हेल्दी राहण्यासाठी शरीरातील सर्वच अवयव कायम सक्रिय असणे आवश्यक आहे. शरीरात होणाऱ्या बदलांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. पण वारंवार दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी धोक्याचे ठरते. लिव्हर शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव आहे. लिव्हर ५० पेक्षा जास्त कामे करतो. पण लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यास शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे सामान्य समस्या समजून लक्ष दिले जात नाही. लिव्हरच्या कार्यात अडथळे आल्यानंतर शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तसेच साचून राहतात, ज्यामुळे रक्त शुद्ध होत नाही. रक्तात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे शरीराला कोणत्याही गंभीर आजाराची लागण होऊ शकते. त्यामुळे लिव्हरची काळजी घेणे जास्त आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर फॅटी लिव्हर, लिव्हरमध्ये पाणी होणे, लिव्हर सोरायसिस, लिव्हर कॅन्सर इत्यादी गंभीर आजार होऊ शकतात. लिव्हर खराब झाल्यानंतर रात्रीच्या वेळी शरीरात अनेक भीतीदायक लक्षणे दिसून येतात. चुकीच्या जीवनशैलीमुळे संपूर्ण शरीराचे कार्य बिघडते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लिव्हर खराब झाल्यानंतर रात्रीच्या वेळी शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. ही लक्षणे दिसताच क्षणाचाही विलंब न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.
लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर रात्रीच्या वेळी शांत झोप लागत नाही. वारंवार झोप खराब होणे, झोपल्यानंतर अस्वस्थ वाटणे इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसू लागतात. याशिवाय झोपेसंबंधित वेगवेगळ्या समस्या दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.
लिव्हर खराब झाल्यानंतर किंवा लिव्हरमध्ये पाणी झाल्यानंतर अंगाला वारंवार खाज येते. अंगावर लाल रॅश किंवा पुरळ उठून सतत खाज येते. लिव्हरमध्ये विषारी घटक तसेच साचून राहतात. हे घटक बाहेर पडून न गेल्यामुळे लिव्हरला हानी पोहचते.
लिव्हर खराब झाल्यानंतर अंगाला सूज येणे, हातपाय दुखणे, पायांच्या टाचांमध्ये वेदना होणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. रात्रीच्या वेळी पायांच्या टाचा खूप जास्त दुखतात. वारंवार पायांच्या टाचा दुखल्यामुळे चालताना त्रास होतो. तसेच रात्रीच्या वेळी उलट्या किंवा मळमळ होऊ शकते. त्यामुळे ही लक्षणे शरीरात दिसू लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.
यकृताच्या नुकसानाची लक्षणे काय आहेत?
यकृत ओटीपोटात असल्यामुळे, जेव्हा यकृत खराब होते तेव्हा पोट फुगू शकते आणि ओटीपोटात वेदना किंवा अस्वस्थता जाणवते.थकवा जाणवणे आणि खूप झोप येणे, झोपण्याची वेळ अनियमित होणे ही काही सामान्य लक्षणे आहेत.
यकृताचे नुकसान कशामुळे होते?
जास्त प्रमाणात अल्कोहोलचे सेवन करणे हे यकृताच्या नुकसानाचे एक प्रमुख कारण आहे.तळलेले आणि तेलकट पदार्थ, जंक फूड, पॅकेज्ड स्नॅक्स आणि फास्ट फूडमध्ये जास्त चरबी असते, ज्यामुळे यकृतावर ताण येतो आणि यकृतात चरबी जमा होते.
यकृताच्या आरोग्यासाठी काय टाळावे?
तळलेले आणि तेलकट पदार्थ, जास्त साखर असलेले पदार्थ, पॅकेज्ड स्नॅक्स आणि फास्ट फूड, अल्कोहोल, रिफाइंड कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थ जसे की पांढरी ब्रेड आणि पास्ता.