यकृतासंबंधित आजार झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' लक्षणे
निरोगी जीवन जगण्यासाठी शरीरातील सर्वच अवयवांचे कार्य निरोगी असणे आवश्यक आहे. शरीरातील एका अवयवांचे कार्य बिघडल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. जंक फूडचे सेवन, आहारात सतत होणारे बदल, अपुरी झोप, पचनाच्या समस्या, पाण्याची कमतरता इत्यादी गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. यकृत शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव आहे. यकृत शरीरातील शरीरातील घाण स्वच्छ करण्यासाठी मदत करते. याशिवाय संपूर्ण शरीर डिटॉक्स करण्यासाठी यकृत महत्वाचे आहे. पण यकृताचे कार्य बिघडल्यानंतर शरीरातील सर्वच अवयवनाचे कार्य बिघडून जाते. शरीर स्वच्छ करण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. (फोटो सौजन्य – iStock)
यकृताचे करी बिघडल्यानंतर यकृत कमकुवत होते, याशिवाय भूक न लागणे, रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होणे, उलट्या होणे, शरीरात सतत अशक्तपणा जाणवणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. याशिवाय यकृतामध्ये सिरोसिससारख्या गंभीर आजाराचा धोका वाढू शकतो. यकृतासंबंधित कोणतीही समस्या उद्भवू लागल्यानंतर शरीरात अनेक लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला यकृताचे कार्य बिघडल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसतात? निरोगी यकृतासाठी कोणते घरगुती उपाय करावे? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
सर्वच ऋतूंमध्ये शरीर हायड्रेट ठेवणे आवश्यक आहे. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीराला हानी पोहचते. याशिवाय यकृताच्या प्रक्रियेमध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे नियमित भरपूर पाणी प्यावे. याशिवाय सकाळी उठल्यानंतर लिंबू पाणी किंवा शरीर डिटॉक्स करणाऱ्या पेयांचे सेवन करावे.
शरीरात वाढलेला मानसिक आरोग्यास हानी पोहचवतो. त्यामुळे तणावपूर्ण जीवन न जगता नेहमी आनंदी असणे आवश्यक आहे. वाढता तणाव शरीराच्या प्रत्येक कार्यावर परिणाम करतो. शरीरात वाढलेला तणाव कमी करण्यासाठी नियमित सकाळी उठून ध्यान, मेडिटेशन किंवा व्यायाम करणे आवश्यक आहे.
अतिप्रमाणात अल्कोहोलचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. त्यामुळे कमीत कमी अल्कोहोलचे सेवन करावे. दारूचे नियमित सेवन केल्यामुळे लिव्हर खराब होणे किंवा लिव्हरमध्ये पाणी होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.






