मायग्रेनची समस्या उद्भवल्यानंतर 'ही' योगासने नियमित करा
दैनंदिन जीवनात डोके दुखीचा त्रास सामान्य समस्या झाली आहे. सतत कामाचा तणाव, अपुरी झोप, अपचन, तासनतास मोबाईल पाहत राहणे इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर दिसून आल्यानंतर अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. त्यातील सामान्यपणे उद्भवणारी समस्या म्हणजे मायग्रेन. मायग्रेनचा त्रास चालू झाल्यानंतर तीव्र डोकेदुखी होण्यास सुरुवात होते. अशावेळी कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही. मायग्रेनचा त्रास होण्यास सुरुवात झाल्यानंतर डोक्याच्या अर्ध्या भागात तीव्र वेदना होण्यास सुरुवात होते. अशावेळी अनेक लोक मेडिकलमध्ये मिळणाऱ्या गोळ्यांचे सेवन करतात. मात्र असे करण्याऐवजी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे, ज्यामुळे लवकरात लवकर आराम मिळाले. मायग्रेनमुळे सतत दोन ते तीन दिवस तीव्र डोके दुखीचा त्रास जाणवतो.(फोटो सौजन्य-istock)
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
आजूबाजूच्या परिसरातील मोठ्या आवाजामुळे किंवा प्रकाशामुळे डोकेदुखीची समस्या उद्भवू लागते. मायग्रेनची समस्या उद्भवू लागल्यानंतर अस्वस्थता, चक्कर येणे, उलट्या आणि मळमळ इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. मायग्रेनची समस्या उद्भवल्यानंतर सतत पेनकिलरच्या गोळ्या खाण्याऐवजी योगसने करावीत. यामुळे लवकर आराम मिळेल. आज आम्ही तुम्हाला मायग्रेनची समस्या उद्भवल्यानंतर सकाळी उठल्यानंतर कोणती योगासने करावीत, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
उष्टासन केल्यामुळे डोकेदुखीच्या समस्येपासून आराम मिळतो. हे आसन करताना गुडघे टेकून जमिनीवर बसा. त्यानंतर दोन्ही हात कंबरेवर ठेवा. दीर्घ श्वास घ्या आणि पाठीच्या खालच्या भागावर पुढे दाब घ्या. शिवाय हे आसन करताना नाभीवर पूर्ण दाब जाणवेल. त्यानंतर हात आणि पाय धरून कंबर खाली वाकवा. 2 ते 3 सेकंड या आसनात राहून नंतर सामान्य स्थितीमध्ये यावे. यामुळे डोकेदुखीची समस्या कमी होईल.
अधोमुखासन करताना सगळ्यात आधी मॅटवर पोटावर झोपा. त्यानंतर हात आणि पाय जमिनीवर ठेवून पाठ आणि कंबर वर उचला. या आसनात दोन ते तीन सेकंड राहून नंतर सामान्य स्थितीमध्ये राहा. श्वास सोडून नंतर पुन्हा एकदा दोन ते तीन वेळा हे आसन करा. यामुळे मायग्रेनमुळे होणारा डोकेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होईल.
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
बालासना करणे अतिशय सोपे आहे. हे आसन नियमित केल्यास सराव होईल. बालासना करताना सगळ्यात आधी मॅटवर गुडघे टेकवून बसा. त्यानंतर शरीराचा सर्व भार टाचांवर टाका. नंतर दीर्घ श्वास घेऊन पुढे वाकण्याचा प्रयत्न करा. हे आसन करताना मांड्याचा छातीला स्पर्श करा. नंतर कपाळाने मजल्याला स्पर्श करा. दोन सेकंड या स्थितीमध्ये राहून नंतर सामान्य स्तिथीमध्ये यावे.