Weight Gain Foods: आजच्या व्यस्त जीवनात एकीकडे लोक वजन कमी करण्याविषयी चर्चा करत असतात, तर दुसरीकडे असे अनेक लोक आहेत जे वजन वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. जर तुम्हीही तुमच्या बारीक असण्यामुळे हैराण असाल आणि वजन लवकर वाढवायचे असेल तर तुमच्या स्वयंपाकघरात असलेले तूप हा एक सोपा आणि प्रभावी उपाय ठरू शकतो. तूप तुमच्या जेवणाची चव तर वाढवतेच पण वजन वाढवण्यासाठीही खूप फायदेशीर आहे. चला जाणून घेऊया त्या 4 पदार्थांबद्दल ज्या तुपासोबत खाल्ल्यास वजन झपाट्याने वाढू शकते. आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी या गोष्टीचा खुलासा केला आहे (फोटो सौजन्य - iStock)
अनेकांना वजन कमी करावे वाटते तसंच काही जणांना वजन वाढ करण्याचीही गरज असते. अशा परिस्थितीत नक्की कोणते पदार्थ तुम्ही खाऊ शकता याबाबत अधिक माहिती आपण घेऊया
तुपाने वजन वाढवताना संतुलित प्रमाण लक्षात ठेवा. जास्त प्रमाणात तूप खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढू शकते. याशिवाय तुमच्या दैनंदिन दिनचर्येत शारीरिक हालचाली आणि व्यायामाचा समावेश करा, जेणेकरून तुमचे वजन निरोगी पद्धतीने वाढेल
तुपासह चपाती वा रोटी खाल्ल्याने जेवण चवदार तर होतेच पण वजन वाढण्यासही मदत होते. तुपामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते आणि चपातीमध्ये असलेले कर्बोदके शरीराला त्वरीत ऊर्जा मिळवून देतात. हे मिश्रण केवळ वजन वाढवण्यास मदत करत नाही तर तुमची पचनशक्ती देखील मजबूत करते
तूप आणि गुळाच्या मिश्रणामुळे तुमच्या शरीराला पोषण मिळते. गुळामध्ये भरपूर लोह असते आणि तुपात आरोग्यदायी फॅट्स आढळतात. जेवणानंतर दररोज एक चमचा तूप आणि गूळ खाल्ल्याने शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढते, त्यामुळे वजन वाढण्यास मदत होते
तूप आणि दूध यांचे मिश्रण वजन वाढवण्याचा सर्वात जुना आणि प्रभावी उपाय आहे. गरम दुधात एक चमचा तूप मिसळून रात्री झोपण्यापूर्वी प्यायल्याने शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि स्नायू मजबूत होतात. या रेसिपीमुळे वजन वाढण्यास मदत होतेच शिवाय गाढ झोपही येते
वजन वाढवण्यासाठी केळी हे सर्वात लोकप्रिय फळांपैकी एक आहे. रोज सकाळी रिकाम्या पोटी केळ्यासोबत एक चमचा तूप खाल्ल्यास भूक तर वाढतेच पण शरीराला आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठाही होतो