
फोटो सौजन्य - Social Media
भारतीय पौराणिक कथा असो वा काही घटना, अशा अनेक गोष्टीतून ‘जर नागाला एकाने मारले तर त्याची नागीण स्वतः बदला घेण्यासाठी येते’ अशी एक समाज लोकांमध्ये तयार झाली. हळू हळू ही समज लोकांची श्रद्धा झाली. आता या श्रद्धेच्या अनुसार, अनेक सिरीयल तसेच चित्रपट निघण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, या सर्व गोष्टी घडत असताना अनेकांना ‘खरंच हे सगळं घडतं?’ असा प्रश्न पडतो आणि तो प्रश्न स्वाभाविक आहे.विज्ञानाच्या दृष्टीने या गोष्टी अशक्य आहेत, तरीही लोकांनी या गोष्टी मानण्यास सुरुवात केली आहे.
या संबंधित एक कथा प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की,” एक शेतकरी शेतात काम करत होता. त्याचवेळी त्याच्या समोरून एक नाग जातो. आपल्या शेताचे रक्षण करण्यासाठी तो त्याच्यासमोर पडलेल्या काठीला उचलून नागावर वार करतो. यात नाग जखमी होऊन मरून जातो. समोरच्या वृक्षावरच त्या नागाची नागीण हे सारं दृश्य तिच्या डोळ्याने पाहत असते. येथून सुरु होते त्या शेतकऱ्याच्या अंताची वेळ! त्याला शारीरिक त्रास होणे सुरु होते. त्याच्या शेताचा आपोआप नाश होणे सुरु होते. तो पूर्णपणे थकून भागून जातो. अडीअडचणी त्याच्या पाठलाग सोडण्याचा नाव नाही घेत, तेव्हा गावातील एक भगत त्याला त्या नागणीची पूजा करून तिला शांत करण्यासाठी सांगतो आणि या पूजेनंतर कुठे त्या शेतकऱ्याला सुखाचा श्वास घेण्यास मिळते.”
ही कथा देशातील अनेक भागात प्रचलित आहेत. अशा अनेक कथांमुळे लोकांमध्ये नागीण बदल घेते असा समाज सुरु झाला आहे. परंतु, वैज्ञानिक म्हणतात की सर्पांना मेंदू कमी असतो, त्यामुळे ते एखाद्या व्यक्तीचा चेहरा फार काळ आठवणीत ठेवू शकत नाहीत, म्हणून वर्षोनवर्ष एकाच व्यक्तीच्या शोधात बदला घेत एखादी नागीण फिरते या गोष्टींना काही तथ्य नाही. परंतु, लोकांनी तसा समज बांधला आहे.