Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivjayanti 2026 : धगधगत्या आगीतून नारळ काढण्याचं साहस अन्…; शिवकाळातील होळीची अंगावर शहारे आणणारी शौर्यपरंपरा

यतेच्या भाजीच्या देठासही धक्का लागणार अशी काळजी शिवरायांनी घेतली. स्वराज्याच्या या थोरल्या धन्याने फक्त परकिय आक्रमणापासून रयतेचं रक्षणच केलं नाही तर पारंपरिक सणावारांना साजरा करण्यास दुजोरा देखील दुजोरा दिला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 16, 2026 | 05:36 PM
Shivjayanti 2026 : धगधगत्या आगीतून नारळ काढण्याचं साहस अन्…; शिवकाळातील होळीची अंगावर शहारे आणणारी शौर्यपरंपरा
Follow Us
Close
Follow Us:

 

  • धगधगत्या आगीतून नारळ, मावळ्यांची निवड
  • छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील होळीची शौर्यपरंपरा
छत्रपती शिवरायांचे आठवावे रुप आठवाव प्रताप असं कायम म्हटलं जातं. रयतेच्या भाजीच्या देठासही धक्का लागणार अशी काळजी शिवरायांनी घेतली. स्वराज्याच्या या थोरल्या धन्याने फक्त परकिय आक्रमणापासून रयतेचं रक्षणच केलं नाही तर पारंपरिक सणावारांना साजरा करण्यास दुजोरा देखील दुजोरा दिला. यातील एक परंपरा म्हणजे होळी. धगधगत्या आगीतून पेटलेला नारळ बाहेर काढण्याची प्रथा आजतागायत सुरु आहे. मात्र आजही सुरु असलेल्या या प्रथेचं मुळ शिवकाळात आहे. ते कसं हे जाणून घेऊयात.

अनेक हिंदू सणवार आणि रितीरिवाजांवर गदा आली होती याचं कारण म्हणजे परकीय आक्रमणं. मुघलांच्या सत्तेचा विळखा इतका वाढत गेला होता की, यामुळे हिंदूंना कोणतेच सण साजरे करता येत नव्हते. मात्र शिवरायांच्या स्वराज्यात मुघलांपासून रयतेला अभय होतं. शिवरायांच्या काळात दिवाळी दसरा प्रमाणेच होळीच्या सणाला मोठं महत्व होतं. खरं तर होळी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यात प्रामुख्याने होते पण प्रत्येक ठिकाणच्या प्रथा आणि परंपरा वेगवेगळ्या आहेत. महाराष्ट्रात होळीच्य़ा याच परंपरेला शौर्याचा देखील इतिहास आहे. शिवरायांच्या काळात एक परंपरा सुरु झाली होती. धगधगत्या आगीतून नारळ बाहेर काढणं. वरवर पाहायला गेलं तर एक मनोरंजन किंवा साहसी खेळ म्हणून पाहिलं जातं. पण यामागे देखील शिवरायांची दूरदृष्टी देखील होती.

Diwali 2025: “स्वराज्याचा थाटच न्यारा”;शिवरायांच्या काळात ‘अशी’ व्हायची दिवाळी साजरी

होळीतून नारळ बाहेर काढणं तसं पाहायला गेलं तर एक निमित्त असायचं. या साहसी खेळामुळे स्वराज्यातील मावळ्य़ांना हेरण्याचं काम शिवराय करत असे. ज्या मावळ्याने निर्भयपणे आगीत हात घालून तो नारळ बाहेर काढला, त्याला विशेष सन्मान दिला जाई. ही केवळ धार्मिक परंपरा नव्हती; तर सैनिकांच्या धाडस, सहनशक्ती आणि आत्मविश्वासाची परीक्षा होती.महाराजांच्या सैन्यातील मावळे पराक्रमी आणि निष्ठावान होते. होळीच्या दिवशी अशा धाडसी कृतीतून कोण खऱ्या अर्थाने रणांगणात उतरायला सक्षम आहे, याची चाचणी घेतली जाई. जो मावळा आगीतून नारळ काढायचा, त्याची निवड विशेष मोहिमांसाठी केली जाई आणि त्याला बक्षीसही दिलं जाई.रायगड किल्ला, प्रतापगड किल्ला अशा किल्ल्यांवर होळी उत्साहात साजरी होत असे. ढोल-ताशांचा गजर, शस्त्रपूजा आणि रणगर्जना यामुळे वातावरण भारलेलं असे. सणासोबतच स्वराज्यरक्षणाची शपथ देखील घेतली जाई.

ही परंपरा दाखवते की स्वराज्याच्या रक्षणासाठी मावळे किती कटिबद्ध होते. सण-उत्सवांनाही शौर्य आणि राष्ट्रप्रेमाची जोड देऊन महाराजांनी समाजात धैर्य, शिस्त आणि एकजूट निर्माण केली.होळीचा हा इतिहास आजही आपल्याला सांगतो की, सण फक्त आनंदासाठी नसतात; ते संस्कार, शौर्य आणि सामूहिक बळ वाढवण्यासाठीही असतात.

शिवजयंती 2025: काळाची गरज! पडीक किल्ल्यांविषयी लोकांना जागृत करणारे कणखर भाषण

 

Web Title: Shivjayanti 2026 the courage to pull a coconut from a blazing fire and the heroic tradition of holi during the shiva era that brings joy to the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 05:36 PM

Topics:  

  • Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti
  • India History
  • shivjayanti

संबंधित बातम्या

शिवजयंती निमित्त नव्या कोऱ्या साडीवर शिवा चंद्रकोर आरी वर्कचे ब्लाऊज, चारचौघांमध्ये होईल तुमच्या लुकची चर्चा
1

शिवजयंती निमित्त नव्या कोऱ्या साडीवर शिवा चंद्रकोर आरी वर्कचे ब्लाऊज, चारचौघांमध्ये होईल तुमच्या लुकची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.