घरच्या घरी झटपट बनवा कैरी पुदिन्याचे चटकदार पाणी
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पाणीपुरी खायला खूप आवडते. पाणीपुरीचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर किंवा इतर वेळी काहींना काही चटकदार पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास पाणीपुरी खाल्ली जाते. पाणीपुरीचे तिखट आणि चिंच पाणी सगळ्यांचं आवडत. मात्र नेहमी नेहमी बाहेर गाडीवरील पाणी पुरी खाण्यापेक्षा घरी सोप्या पद्धतीमध्ये पाणीपुरी आणि पाणीपुरीसाठी लागणारे पाणी तुम्ही बनवू शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कैरी पुदिन्याचे चटकदार पाणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात कैरी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. त्यामुळे तुम्ही झटपट कैरीचे पाणी बनवू शकता.(फोटो सौजन्य – iStock)
सकाळच्या नाश्त्यात कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा काकडीची भाकरी, उद्भवणार नाही पचनाची समस्या
कधीच उद्भवणार नाही पचनाची समस्या! रोजच्या आहारात करा पुदिना ताकाचे सेवन, शरीर राहील फ्रेश