फोटो सौजन्य: iStock
सिगारेट ओढल्याने ताण हलका होतो का? खरंतर प्रत्यक्षात असे काहीही घडत नाही. हा फक्त मनाचा एक खेळ आहे. या लेखात आपण सिगारेट, चहा किंवा अशा कोणत्याही गोष्टीचे व्यसन कसे लागते याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.
हल्ली अनेक स्ट्रेस कमी करण्यासाठी सिगारेट पित असतो अशी कारणं देताना दिसतात. जर एखाद्या व्यक्तीला असे वाटत असेल की चहा पिणे, दारू पिणे किंवा सिगारेट ओढणे यामुळे ताण कमी होतो, तर ते पूर्णपणे खोटे आहे. चहा किंवा सिगारेटमध्ये आढळणाऱ्या निकोटीनमुळे, अशा गोष्टी प्यायल्यानंतर तुमचे मन काही काळासाठी आरामशीर होऊ शकते. पण या प्रकारची विश्रांती पूर्णपणे तात्पुरती असते. याचा अर्थ असा की असे केल्याने तुम्हाला दीर्घकालीन आराम मिळण्याऐवजी कमी वेळेपुरतंच आराम मिळू शकेल.
Cervical Cancer: गर्भाशयाच्या आरोग्याविषयी महिलावर्गात पसरतायत गैरसमजुती, काय आहे तथ्य
आरोग्य तज्ञांचा असा विश्वास आहे की हा सर्व सायकोलॉजीचा खेळ आहे, ज्यामुळे तुम्हाला काही काळ सिगारेट ओढल्यानंतर पूर्णपणे आराम वाटेल. तुम्ही कमी वेळेपुरतंच आनंदासाठी धूम्रपान करता परंतु असे केल्याने तुमचा ताण दीर्घकाळ वाढतो. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही तणाव कमी करण्यासाठी सिगारेट ओढता, तेव्हा निकोटीनचा प्रभाव कमी होताच तुम्हाला पुन्हा धूम्रपान करण्याची इच्छा होते.
लोकांना सिगारेटची इच्छा होण्याचे मुख्य कारण म्हणजे निकोटीन जास्त प्रमाणात सेवन केल्यास ते व्यसनाधीन ठरू शकते, जे मेंदूमध्ये डोपामाइन (आनंद देणारे हार्मोन) सोडते. हा एक कमी वेळेपुरतंच आनंद आहे जो लवकर नाहीसा होतो, ज्यामुळे ती भावना परत मिळवण्यासाठी पुन्हा धूम्रपान करण्याची इच्छा निर्माण होते.
एकदा निकोटीनची पातळी कमी झाली की, शरीराला चिडचिड, चिंता, लक्ष केंद्रित करण्यात अडचण आणि अस्वस्थता यासारखी लक्षणे जाणवतात, ज्यामुळे या भावना कमी करण्यासाठी धूम्रपान करण्याची सवय लागू शकते, ज्यामुळे अनेक व्यसनांना जन्म मिळतो.
धूम्रपान बहुतेकदा विशिष्ट परिस्थिती किंवा भावनांशी (जसे की ताण किंवा कंटाळवाणेपणा) संबंधित असते, म्हणून अनेक जण सिगारेट ओढत असतात.
सिगारेट ओढल्याने तुम्हाला त्यावेळी शांत वाटू शकते, परंतु त्यामुळे जास्त काळ ताण कमी होत नाही. पण एकदा तुम्हाला सिगारेटचे व्यसन लागले की, तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.म्हणूनच सिगारेट ओढणे हा तणाव कमी करण्याचा मार्ग नाही तर आरोग्यासंबंधित संकटं ओढवण्याचा मार्ग आहे.