शारीरिक संबंधामुळे वजन वाढते का
लग्नानंतर मुलींचे वा मुलांचे वजन वाढते हा फक्त एक गैरसमज आहे. लग्नानंतर शारीरिक संबंध ठेवल्याने वजन अजिबात वाढत नाही आणि अथवा असे कोणतेही संशोधन नाही. अशा परिस्थितीत विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पहायचे असेल तर हा केवळ गैरसमज आहे. पण हो हे खरे आहे की शारीरिक संबंधांमुळे शरीरात बदल होतात.
शारीरिक संबंध हादेखील एक उत्कृष्ट व्यायाम मानला जातो हे फार कमी लोकांना माहिती आहे. शारीरिक संबंधांमुळे भरपूर कॅलरीज बर्न होतात. मात्र त्याचा अर्थ असा नाही की यामुळे वजन वाढते. स्त्रीरोगतज्ज्ञ अनिल पाटील यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे आणि सर्वांच्या मनात असलेल्या शंकेचे निरसनही केले आहे (फोटो सौजन्य – iStock)
शारीरिक संबंधाने वजन वाढते का?
लग्नानंतर वजन का वाढते
जर तुम्हाला असेही वाटत असेल की शारीरिक संबंध केल्याने तुमचे वजन वाढते, तर मुळात असे काही होत नाही. वजन वाढण्याचा थेट संबंध शारीरिक संबंधाशी नसून हो तो तुमच्या हार्मोन्सशी संबंधित आहे. हार्मोन्सच्या असंतुलनामुळे वजन वाढू शकते हे अनेक तज्ज्ञही सांगतात आणि अनेक अभ्यासातही हे सिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही रोज शारीरिक संबंध ठेवले तरीही त्याचा संबंध वजन वाढण्याशी येत नाही असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
उपाय काय आहे?
हार्मोन्सच्या असंतुलनामुळे तुमचे वजन वाढत असेल तर यावर उपाय काय? जंक फूड आणि तळलेले पदार्थ किंवा मसालेदार पदार्थ कमी करा. भरपूर झोप घ्या. तणाव, नैराश्य आणि चिंता होणार नाही याची काळजी घ्या. जर तुम्ही अशा परिस्थितीतून जात असाल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या असेही तज्ज्ञांनी यावेळी सांगितले.
हेदेखील वाचा – शारीरिक संबंध न ठेवता किती काळ जिवंत राहू शकता? काय सांगता तज्ज्ञ?
मिथक की सत्य?
यामागील सत्य काय आहे
अनेकांना अजूनही मनामध्ये ही शंका असते की रोज शारीरिक संबंध ठेवले तर अचानक वजन वाढेल आणि त्याचा आपल्या शरीरावर वेगळाच परिणाम होऊ शकतो. मात्र असे अजिबात नाही हे एक मिथक असून यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे यावेळी स्त्रीरोगतज्ज्ञांनी सांगितले. मात्र त्याचा अतिरेक करणं योग्य नाही. शारीरिक संबंध हे आनंदासाठी आणि आरोग्यासाठी ठेवले जातात, त्याचा त्रास होईल अशी कोणतीही क्रिया न करणे योग्य. तसेच लग्नानंतर शारीरिक संबंध ठेवण्याआधी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी एकदा सल्लामसलत करून घणे अत्यंत गरजेचे आहे हेदेखील तितकेच गरजेचे आहे.
हेदेखील वाचा – वयानुसार दर महिन्यात किती वेळा ठेवावे शारीरिक संबंध? धक्कादायक आकडे अहवालातून समोर
काय काळजी घ्यावी
तुम्हाला लग्नानंतर जर लठ्ठपणा यायला नको असेल तर तुम्ही शारीरिक संबंध ठेवल्यानंतर नियमित आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी व्यायाम करावा. घरातील अन्न खावे. जंक फूड वा फास्ट फूडवर ताव मारणे कमी करणे अत्यंत गरजेचे आहे. तुमचे हार्मोन्स अधिक लवकर बदलत असल्यामुळे आपल्या खाण्यावर नियंत्रण ठेवावे. यामुळे तुमचा लठ्ठपणा वाढणार नाही आणि तुम्हाला त्रासही होणार नाही.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.