महिन्यातून किती वेळा कोणत्या वयाच्या व्यक्ती ठेवतात शारीरिक संबंध
बरेचदा आपल्याकडे भारतात शारीरिक संबंधाबाबत खुलेपणाने चर्चा होत नाही. मात्र याबाबत अनेकजण लपूनछपून वाचण्याचा प्रयत्न करत असतो. सध्या जगभरात याबाबत सर्व्हे करून अहवाल काढण्यात आलाय. या अहवालामुळे जगभरातील हजारो लोकांच्या लैंगिक जीवनाबाबत माहिती समोर आली आहे.
इंडियाना युनिव्हर्सिटीच्या किन्से इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी हा अहवाल तयार केला आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या पिढीतील लोक एका महिन्यात सरासरी किती वेळा शारीरिक संबंध ठेवतात याची माहिती देण्यात आली आहे. या अहवालातील आकडेवारी धक्कादायक असून जनरेशन Z चे लैंगिक जीवन मागील पिढ्यांपेक्षा खूपच कमी सक्रिय असल्याचे दर्शविते. काय सांगतो हा अहवाल वाचा (फोटो सौजन्य – iStock)
कसा केला सर्व्हे?
सर्व्हेक्षणात काय झाले सिद्ध
या अहवालाचे शीर्षक ‘द स्टेट ऑफ डेटिंग: हाऊ जनरल Z रिडिफाईनिंग सेक्सुआलिटी अँड रिलेशनशिप्स’ असे आहे. हा अहवाल फील्ड नावाच्या डेटिंग ॲपवरील 3,310 हून अधिक लोकांच्या डेटावर आधारित आहे. यामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींचे वय 18 ते 75 वर्षांच्या दरम्यान होते आणि ते 71 वेगवेगळ्या देशांतील होते. त्यांच्या लैंगिक जीवनाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी त्यांना सर्वेक्षणात समाविष्ट करण्यात आले.
सर्वेक्षणात काय मिळाली उत्तरं?
अहवालाच्या आकडेवारीनुसार, सरासरी, Z जनरेशन सहभागी झालेल्या व्यक्तींनी गेल्या महिन्यात केवळ 3 वेळा शारीरिक संबंध ठेवल्याचे नोंदवले. त्याच वेळी, Millennials आणि Generation X मध्ये किंचित जास्त प्रमाणात शारीरिक संबंध असल्याचे आढळले. या दोन्ही पिढ्यांनी गेल्या महिन्यात पाच वेळा शारीरिक संबंध ठेवल्याचे या अहवालात नमूद करण्यता आले आहे. बूमर्सने केवळ 3 वेळा शारीरिक संबंध ठेवला. हा डेटा दर्शवितो की जनरेशन Z आणि बूमर्स यांचे लैंगिक जीवन हे सर्वसाधारण आहे.
हेदेखील वाचा – गर्भधारणा झाल्यास शारीरिक संबंध का ठेवू नये? नक्की वाचा…
Generation Z का आहे मागे?
काय आहेत कारणं?
संशोधकांचे म्हणणे आहे की जेन Z पिढीतील लोकांकडे शारीरिक संबंधांसाठी कमी वेळ असतो कारण ते त्यांच्या करिअर आणि इतर गोष्टींवर अधिक लक्ष केंद्रित करतात. अहवालानुसार, “जेन Z आणि बूमर्स दोघांची लैंगिक वारंवारता जवळजवळ समान आहे, हे दर्शविते की सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर लोकांमध्ये सर्वात कमी सक्रिय लैंगिक जीवन आहे.” याव्यतिरिक्त, अहवालात असेही आढळून आले की जेन Z मधील जवळजवळ निम्मे सहभागी झालेले व्यक्ती हे अविवाहित होते, तर मिलेनिअल्स, जनरेशन एक्स आणि बूमर्सचे फक्त एक-पंचमांश भाग हे (20%) अविवाहित होते.
जेन Z चा अनुभव
जेन Z पिढीचे लैंगिक जीवन कमी सक्रिय असले तरी, ही पिढी बेडरूममध्ये सर्वात साहसी असल्याचे सांगण्यात येत आहे. अहवालात असे आढळून आले की 55% जेन Z सहभागींनी फील्ड ॲपवर कनेक्ट केल्यानंतर नवीन Kink शोधली. तुलनेत, मिलेनिअल्समध्ये हा आकडा 49%, जनरेशन X मध्ये 39% आणि बूमर्समध्ये 33% होता.
योग्य संख्या काय आहे?
संशोधकांचे म्हणणे आहे की लैंगिक संभोगाची नेमकी संख्या प्रत्येक व्यक्तीनुसार बदलू शकते. काहींसाठी, आठवड्यातून एकदा शारीरिक संबंध ठेवणे पुरेसे असू शकते, तर काहींना ते कमी वाटू शकते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आणि तुमचा जोडीदार दोघेही समाधानी आहात की नाही यानुसार ही संख्या ठरते.