Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिवाळ्यात केस कोरडी आणि निर्जीव होतायेत? मग अशाप्रकारे करा जवसाच्या बियांचा वापर 

हिवाळ्यात केस कोरडे आणि निर्जीव होतात. जवसाच्या बिया केसांना ओलावा, पोषण व नैसर्गिक चमक देतात. हा घरगुती जेल केस मऊ, मजबूत व निरोगी बनवण्यास मदत करतो.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 23, 2025 | 07:31 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • जवसामध्ये  ओमेगा-3, व्हिटॅमिन E व अँटिऑक्सिडंट्स असून ते केसांना खोलवर पोषण देतात.
  • तांदळातील स्टार्च केसांच्या क्युटिकल्स सील करून मऊपणा आणि मजबुती वाढवतो.
  • जवस–तांदूळ जेल आठवड्यातून 2–3 वेळा वापरल्यास केस अधिक चमकदार आणि हायड्रेटेड होतात.
हिवाळा आला की बहुतेक लोकांच्या केसांचा कोरडेपणा वाढतो. थंड वाऱ्यामुळे केसांतील नैसर्गिक ओलावा कमी होतो आणि केस राठ, बेजान आणि तुटणारे होतात. अनेकजण अशा वेळी सलूनमध्ये जाऊन महागडे ट्रीटमेंट घेतात; परंतु प्रत्यक्षात घरच्या घरीही काही सोपे आणि नैसर्गिक उपाय करून केसांना पुन्हा मऊ, चमकदार आणि निरोगी बनवता येते. त्यापैकी एक उत्कृष्ट उपाय म्हणजे जवसाच्या बिया.

आरोग्याची चिंता सोडा आवडीने मुलांना खाऊ घाला गव्हाच्या पिठाचा चविष्ट पिझ्झा; रेसिपी नोट करा

जवससांसाठी इतकी फायदेशीर का?

जवासामध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन ई आणि भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात. हे सर्व पोषक घटक केसांना आतून पोषण देतात, कोरडेपणा कमी करतात आणि केसांना खोलवर हायड्रेशन मिळवून देतात. ओमेगा-3 फॅटी अॅसिड केसांची जाडी वाढवते आणि स्काल्पचे आरोग्य सुधारते. व्हिटॅमिन ई केसांना बाहेरील नुकसानापासून संरक्षण देते. अँटिऑक्सिडंट्स केसांच्या वाढीस मदत करतात आणि तुटणे कमी करतात. यामुळे केस अधिक मऊ, लवचिक आणि नैसर्गिकरित्या चमकदार दिसतात.

जवस आणि भिजलेल्या तांदळाच्या पाण्याचा जेल तयार करण्याची सोपी पद्धत

  • सर्वप्रथम गॅसवर एक भांडे गरम करा.
  • त्यात २ कप पाणी ओतून उकळू द्या.
  • पाणी गरम होताच त्यात २ चमचे जवसाच्या बिया आणि २ चमचे भिजवलेले तांदूळ घाला.
  • तांदळामध्ये असलेला स्टार्च केसांना मजबुती देतो, केसांच्या क्युटिकल्स सील करून त्यांना मऊ आणि गुळगुळीत बनवतो. त्यामुळे
  • उलझणे कमी होते आणि केस तुटण्याची समस्या कमी दिसते.
  • मिश्रणात उकळी येऊ लागली की गॅस बंद करा.
  • हे मिश्रण थोडे थंड झाल्यावर एका बारीक गाळणीने दुसऱ्या बाऊलमध्ये गाळून घ्या.
  • मिळालेला घट्टसर जेलसारखा द्रव एका स्वच्छ कंटेनरमध्ये साठवा.
कसा वापर करायचा?
  • केस धुण्यापूर्वी हा जेल हलक्या हाताने स्काल्पवर आणि केसांच्या लांबीवर लावा.
  • २०–३० मिनिटे तसेच ठेवून नंतर माइल्ड शॅम्पूने केस धुवा.
  • आठवड्यातून २–३ वेळा हा उपाय केला तर केस  मऊ, चमकदार आणि हायड्रेटेड दिसू लागतील.

संध्याकाळी भूक लागल्यानंतर काय खावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा रव्याचा उत्तपा, लहान मुलं खातील आवडीने

जवस आणि तांदळाच्या स्टार्चचा हा नैसर्गिक जेल केसांना पोषण, ओलावा आणि चमक देण्यासाठी एक प्रभावी घरगुती उपाय आहे. हिवाळ्यात केस कोरडे होण्याची समस्या असेल तर महागडे ट्रीटमेंट न घेता हा सोपा, सुरक्षित आणि किफायतशीर उपाय नक्की वापरून पहा. हिवाळ्यात केस कोरडे आणि निर्जीव होतात. जवसाच्या बिया अन्तांI दळाचे पाणी केसांना ओलावा, पोषण व नैसर्गिक चमक देतात. हा घरगुती जेल केस मऊ, मजबूत व निरोगी बनवण्यास मदत करतो.

Web Title: Does your hair become dry and lifeless in winter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 07:31 PM

Topics:  

  • Winter Season

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.