
फोटो सौजन्य - Social Media
डोकेदुखी, अंगदुखी किंवा ताप आल्यास अनेक लोक त्वरित डोलो किंवा पॅरासिटामॉलची गोळी घेतात. यामुळे त्यांना लगेच आराम मिळतो. ही दोन्ही औषधे जगभरात मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. ताप, स्नायू वेदना, डोकेदुखी आणि सौम्य सर्दीच्या लक्षणांवर ही प्रभावी मानली जातात. डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतल्यास ही औषधे सुरक्षित आणि परिणामकारक ठरतात. मात्र, अनेकदा प्रश्न पडतो की डोलो आणि पॅरासिटामॉल यामधून अधिक चांगले आणि प्रभावी औषध कोणते आहे?
पॅरासिटामॉल म्हणजे काय?
पॅरासिटामॉल हे एक जेनरिक औषध असून वेदना व ताप कमी करण्यासाठी वापरले जाते. 1960 पासून हे बाजारात उपलब्ध आहे. डोलो, क्रोसिन आणि कालपोल हे वेगवेगळ्या ब्रँडनावे पॅरासिटामॉल विकले जातात. त्यामुळे लोक पॅरासिटामॉलच्या कॉपीलाच डोलो म्हणू लागले आहेत.
पॅरासिटामॉल हे एक अँटी-पायरेटिक (ताप कमी करणारे) आणि एनाल्जेसिक (वेदनाशामक) औषध आहे. ताप, डोकेदुखी, स्नायू वेदना आणि सौम्य सर्दीच्या लक्षणांवर हे प्रभावी आहे. ही गोळी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय सहज उपलब्ध होते आणि सुरक्षित मानली जाते.
डोलो 650 म्हणजे काय?
कोरोना काळात डोलो 650 हे सर्वाधिक शोधले गेलेले औषध होते. हे देखील पॅरासिटामॉलच आहे, पण यात 650mg पॅरासिटामॉल असतो, तर सामान्य पॅरासिटामॉलच्या गोळीमध्ये 500mg असतो. Micro Labs Ltd ही कंपनी डोलो तयार करते. हे ताप कमी करण्यासोबतच शरीरातील सूज व वेदना कमी करण्यास मदत करते.
डोलो आणि पॅरासिटामॉल – कोण अधिक प्रभावी?