सर्वांना हवाहवासा वाटणारा पाहुणा येणार याचा उत्साह हा उत्सव सुरू होण्याआधीच वाहू लागतो. पण गणरायाचे प्रतिक म्हणून आणल्या जाणाऱ्या मूर्तीविषयी शास्त्रात काही नियम सांगितले आहेत. त्याचे पालन करणे गरजेचे आहे.
गणपतीची १ फुटांपेक्षा जास्त मोठी मुर्ती नसावी.
मुर्ती एका व्यक्तीला सहज उचलुन नेता व आणता आली पाहिजे.
सिंहासनावर किंवा लोडाला टेकून बसलेल्या विश्राम अवस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम.
साप, गरुड, मासा, किंवा युद्ध करतांना व चित्रविचित्र आकारातील गणपती मुळीच घेऊ नये,
शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेला गणपती मुळीच घेऊ नये, कारण शिव पार्वतीची पुजा लिंगस्वरुपातच केली जाते शास्त्रात मुर्ती निषिद्ध आहे,
गणेश मुर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून घरी आणूनये,
गणपतीची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मुर्ती मध्ये देवत्व येत नाही, तोवर ती केवळ माती समजावी. विधीवत प्राणप्रतिष्ठा करावी.
मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याअगोदर काही कारणास्तव मुर्ति भंग झाल्यास अजिबात घाबरू नये, त्या मुर्तीस दहीभात नैवेद्य दाखवून त्वरीत विसर्जन करावे, व दुसरी मुर्ती आणून प्रतिष्ठापना करावी, मनात कोणतेही भय व शंका आणू नये.
कुटुंबात किंवा नात्यात मृत्यु झाल्यास सुतकात घरातील व्यक्ती ऐवजी, शेजारी, मित्रमंडळी यांचे करवी पुजा नैवेद्य दाखवून घ्यावा, गणपती विसर्जनाची घाई करू नये,
गणपती प्राणप्रतिष्ठा झाल्यावर घरात वादविवाद व मद्य मांसाहार अजिबात करू नये,
गणपती ला साधा भाजी भाकरीचा नैवेद्य रोज दाखवला तरी चालतो, केवळ आंबट व तिखट पदार्थ नसावेत, दही+साखर+भात हा सर्वोत्तम नैवेद्य आहे.
Web Title: Dont make these mistakes while taking the idol of shri ganapati nrrd