Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tips To Remove Fish Bone: मच्छीचा काटा घशात अडकला? घाबरू नका, ‘हे’ करा उपाय

Tips To Remove Fish Bone: माशाचा काटा घशात अडकल्याचे जाणवत असल्यास घाबरून न जाता सर्वप्रथम जेवण थांबवणे महत्त्वाचे आहे. घशात हात घालून काटा काढण्याचा प्रयत्न करू नये किंवा जोरात घसा खाकरत राहू नये. श्वास व्यवस्थित घेत येत असेल.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 14, 2026 | 02:51 PM
Tips To Remove Fish Bone: मच्छीचा काटा घशात अडकला? ( फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Tips To Remove Fish Bone: मच्छीचा काटा घशात अडकला? ( फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • माशाचा काटा अडकल्यास लगेच खाणे थांबवा.
  • दिसत नसलेला काटा बोटाने काढण्याचा प्रयत्न करू नका.
  • श्वास व्यवस्थित घेत येत असेल तर नैसर्गिक खोकला दाबू नका.
  • श्वास घेण्यास किंवा बोलण्यास त्रास होत असल्यास तातडीची वैद्यकीय मदत घ्या.
माशाचा काटा घशात अडकला आहे असं जाणवत असेल, तर सर्वात आधी जेवण थांबवा. जोरात घसा खाकरत राहू नका आणि हात घालून काटा शोधण्याचाही प्रयत्न करू नका. दिसत नसलेली वस्तू बोटाने काढण्याचा प्रयत्न केल्यास ती आणखी आत जाऊ शकते.

खोकला येत असेल तर तो थांबवू नका

काटा घशाच्या वरच्या भागात अडकला असेल आणि तुम्हाला व्यवस्थित श्वास घेता येत असेल, तर नैसर्गिकरित्या येणारा खोकला काही वेळा मदत करू शकतो. खोकताना शरीर स्वतःच अडथळा बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतं. मात्र खोकला येत नाही, बोलता येत नाही किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर ही साधी काट्याची समस्या समजून दुर्लक्ष करू नका. श्वसनमार्ग बंद होण्याची शक्यता असू शकते आणि तातडीची मदत आवश्यक असते.

भाताचा मोठा घास घेणं खरंच योग्य आहे?

माशाचा काटा खाली ढकलण्यासाठी भाताचा मोठा गोळा, ब्रेडचा तुकडा किंवा केळं गिळण्याचा सल्ला अनेक घरांत दिला जातो. पण काटा टोकदार असल्यामुळे अशा पद्धतीने जबरदस्तीने पदार्थ गिळणे योग्यच असेल असं नाही. उलट अडकलेला काटा अधिक खोलवर जाऊ शकतो किंवा घशाला इजा होऊ शकते. Tips To Remove Fish Bone:

म्हणून ‘काहीतरी खाल्लं की काटा आपोआप खाली जाईल’ या घरगुती समजुतीवर पूर्णपणे अवलंबून राहू नका. विशेषतः टोचण्याची वेदना कायम राहिली तर स्वतःहून प्रयोग करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेणं सुरक्षित आहे. टोकदार वस्तू अन्ननलिकेला इजा करू शकतात.

कोल्ड्रिंक किंवा व्हिनेगरचा प्रयोग?

काटा काढण्यासाठी सोडा, कोल्ड्रिंक, व्हिनेगर किंवा इतर पदार्थ घेण्याच्या अनेक टिप्स इंटरनेटवर आणि घरगुती चर्चांमध्ये ऐकायला मिळतात. काही वेळा गॅस असलेलं पेय अन्ननलिकेत अडकलेली वस्तू पुढे जाण्यास मदत करू शकतं, अशी वैद्यकीय माहिती उपलब्ध आहे. मात्र माशाचा काटा हा टोकदार असतो. त्यामुळे फक्त पेय पिऊन तो निघेलच, असं मानणं योग्य नाही.

Kitchen Tips : गरम जेवण थेट फ्रिजमध्ये ठेवलं तर काय होतं? ‘या’ गैरसमजामागचं सत्य जाणून घ्या

नेमकं कधी डॉक्टरांकडे जावं?

काटा अडकला असल्याची भावना सतत राहात असेल, गिळताना त्रास होत असेल, छातीत किंवा घशात वेदना जाणवत असतील किंवा पाणीही नीट गिळता येत नसेल, तर वैद्यकीय मदत घेणं आवश्यक आहे. काही वेळा काटा निघून गेल्यानंतरही घशावर झालेल्या ओरखड्यामुळे काही काळ टोचल्यासारखं वाटू शकतं. मात्र त्रास वाढत असेल तर तपासणी करून घेणं चांगलं.

श्वास घेण्यास अडचण, सतत गुदमरल्यासारखं होणं किंवा थुंकीसुद्धा गिळता न येणं ही धोक्याची चिन्हं आहेत. अशा वेळी घरगुती उपाय करत बसू नका. तातडीने वैद्यकीय मदत घ्या.

आता बायोप्सीची गरज कमी होणार? लाळ आणि स्वॅबमधून ओरल कॅन्सरची प्राथमिक तपासणी शक्य

माशाचा काटा अडकणं ही छोटी गोष्ट वाटली तरी त्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. पुढच्या वेळी अशी वेळ आली, तर घाबरून मोठमोठे घास गिळण्यापेक्षा आधी शांत राहा, श्वास व्यवस्थित आहे का ते पाहा आणि त्रास कायम असल्यास डॉक्टरांकडे जा. काही मिनिटांची काळजी पुढचा मोठा त्रास टाळू शकते.

 

Web Title: Easy ways to remove fishbone stuck in throat what to do if fishbone gets stuck in throat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • Best Food Tips
  • Latest Marathi News
  • lifestlye tips

संबंधित बातम्या

Bollywood Fashion: सिंपल लूक, जबरदस्त स्वॅग! हृतिक, टायगर ते टिमोथींचे स्टायलिश लूक्स
1

Bollywood Fashion: सिंपल लूक, जबरदस्त स्वॅग! हृतिक, टायगर ते टिमोथींचे स्टायलिश लूक्स

Different Thyroid Reports: दोन लॅबचे थायरॉईड रिपोर्ट वेगळे आले? घाबरण्याआधी ‘या’ गोष्टी जाणून घ्या
2

Different Thyroid Reports: दोन लॅबचे थायरॉईड रिपोर्ट वेगळे आले? घाबरण्याआधी ‘या’ गोष्टी जाणून घ्या

Tanvi Kolte New Song: बिग बॉसनंतर तन्वी कोलतेचा नवा अंदाज;  ‘या’ गाण्यामधून पहिल्यांदाच अल्बम साँगमध्ये Entry
3

Tanvi Kolte New Song: बिग बॉसनंतर तन्वी कोलतेचा नवा अंदाज; ‘या’ गाण्यामधून पहिल्यांदाच अल्बम साँगमध्ये Entry

Zero Oil Cooking: तेलाशिवाय स्वयंपाक करणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या त्याचे फायदे आणि काही महत्त्वाच्या गोष्टी
4

Zero Oil Cooking: तेलाशिवाय स्वयंपाक करणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या त्याचे फायदे आणि काही महत्त्वाच्या गोष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.