Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवाळीनंतरच्या हवेचा फुफ्फुसांच्या आरोग्यावर होणारा परिणाम, तज्ज्ञांनी दिला सोपा उपाय

दिवाळीनंतर हवेतील प्रदूषण अधिक वाढते आणि त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर आणि विशेषतः फुफ्फुसांवर होताना दिसून येतो. पण यासाठी नक्की काय काळजी घ्यायची याबाबत तज्ज्ञांनी सांगितले आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 31, 2025 | 03:12 PM
फुफ्फुसावर दिवाळीनंतर प्रदूषणाचे काय परिणाम होतात (फोटो सौजन्य - iStock)

फुफ्फुसावर दिवाळीनंतर प्रदूषणाचे काय परिणाम होतात (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • दिवाळीनंतर हवेतील प्रदूषण
  • काय होतो शरीरावर परिणाम
  • फुफ्फुसांवर थेट होतो परिणाम 
दिवाळीची चमक आणि धुमधाम आनंद देते तर दुसरीकडे फटाक्यांमुळे वातावरणातील वायू प्रदूषण वाढवण्यास कारणीभूत ठरते. दिवाळीच्या काळात झपाट्याने खालावणारी हवेची गुणवत्ता हा एक चिंतेचा विषय आहे कारण याचे हानिकारक परिणाम हजारो लोकांना भोगावे लागतात. फटाके, रस्त्यावर वाढलेली वाहनांची गर्दी आणि याच काळात होणारा ऋतुबदल या सगळ्याची सरमिसळ विषारी हवेचे कॉकटेल तयार करते जे श्वसनाच्या आरोग्यासाठी गंभीर धोका उत्पन्न करते. डॉ. विनोद चौहान, कन्सल्टंन्ट, चेस्ट फिजिशियन आणि पल्मोनोलॉजिस्ट, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबई यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

दिवाळीनंतरची हवा 

दिवाळीनंतर दिल्ली, मुंबई आणि पुणे यांसारख्या शहरी भागांमध्ये हवेतील प्रदूषण, विशेषतः PM२.५ आणि PM१० अशा अतिसूक्ष्म कणांची (पार्टिक्युलेट मॅटर) पातळी धोकादायक प्रमाणात वाढते. हे कण 2.5 मायक्रॉनपेक्षाही लहान असल्यामुळे फुफ्फुसांच्या आत खोलवर शिरतात आणि रक्ताभिसरण संस्थेमध्येही प्रवेश करू शकतात. मागील वर्षांच्या आकडेवारीनुसार, वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) अनेकदा “गंभीर” पातळी ओलांडतो. हा निर्देशांक जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलेल्या सुरक्षित मर्यादेच्या दहापट जास्त असतो.

दिवाळी संपल्यानंतरही प्रदूषण आणखी वाढलेले दिसते, कारण हवामानाचे काही घटक त्यात भर घालतात. थंडी, शांत वारे आणि वाढलेली आर्द्रता यांसारख्या स्थितीमुळे प्रदूषक घटक जमिनीच्या जवळ अडकून राहतात. धूर व धुके मिसळून तयार झालेले प्रदूषण पुढील अनेक दिवस टिकून राहते.

फुफ्फुस कमजोर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास शरीर होईल निकामी

फुफ्फुसांच्या आरोग्यावर परिणाम 

दिवाळीनंतरच्या प्रदूषित हवेमुळे श्वसनाचे गंभीर आजार होऊ शकतात. ज्या व्यक्तींना आधीपासूनच दमा, सीओपीडी (क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज) किंवा ब्राँकायटिससारखे फुफ्फुसांचे आजार आहेत, त्यांच्यासाठी हा काळ खूप जिकिरीचा ठरू शकतो. इतकेच नव्हे तर, निरोगी व्यक्तींनाही खोकला, घशात जळजळ, छातीत जडपणा आणि श्वास घेण्यास त्रास होणे यांसारखी लक्षणे जाणवू शकतात.

सूक्ष्म कणांच्या संपर्कात दीर्घकाळपर्यंत राहिल्यास श्वसनाचे जुनाट आजार वाढण्याचा, फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होण्याचा आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी गुंतागुंत होण्याची शक्यता वाढते. लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे, त्यांना सर्वात जास्त धोका असतो. दिवाळीनंतरच्या काही आठवड्यांमध्ये अस्थम्याचा त्रास वाढतो आणि श्वसनाचे संसर्ग वाढल्यामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे बालरोग तज्ञांनी सातत्याने नोंदवले आहे.

काय आहेत उपाययोजना

  • हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवा: एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) तपासत रहा आणि प्रदूषणाची पातळी जास्त असताना बाहेरच्या वातावरणात जाणे टाळा
  • संरक्षक मास्क वापरा: प्रवास करताना किंवा बाहेर असताना उच्च प्रतीचे एन९५ किंवा एन९९ मास्क वापरा, जे बारीक धुलिकण प्रभावीपणे फिल्टर करतात
  • घरातील हवा स्वच्छ ठेवा: प्रदूषण जास्त असताना, विशेषतः सकाळी लवकर आणि संध्याकाळी, खिडक्या बंद ठेवा. एअर प्युरिफायरचा वापर करा
  • फुफ्फुसांची प्रतिकारशक्ती वाढवा: शरीराला हायड्रेटेड ठेवा, दीर्घ श्वसनाचे व्यायाम करा आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक असलेली फळे आणि पालेभाज्या यांचा आहारात समावेश करा
  • वेळेवर वैद्यकीय मदत घ्या: दमा (Asthma) किंवा सीओपीडी (COPD) असलेल्या लोकांनी डॉक्टरांनी सांगितल्यानुसार इनहेलरचा वापर करावा आणि लक्षणे वाढल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सण साजरे करताना पर्यावरणाचे भान राखा

सण पर्यावरण-स्नेही पद्धतीने साजरे करण्याबाबतची जागरूकता वाढत आहे, तरीही सर्वांनी मिळून कृती करणे आवश्यक आहे. फटाक्यांचा वापर कमी करणे, हरित फटाक्यांना प्रोत्साहन देणे आणि सामुदायिक स्तरावर सण साजरे करण्याला प्रेरित केल्याने हानिकारक वायूंचे उत्सर्जन लक्षणीय प्रमाणात कमी होऊ शकेल. सरकार देखील हवेची गुणवत्ता योग्य राहावी यासाठी प्रयत्न करत आहे, उत्सर्जनविषयक नियमांची अंमलबजावणी अधिक कठोरपणे केली गेल्यास सुधारणांना अधिक वाव मिळेल. 

दिवाळी म्हणजे अंधःकारावर मात करणाऱ्या प्रकाशाचा उत्सव. हा अर्थ आपल्या पर्यावरणापर्यंत पोहोचवून आता आपण अधिक जास्त जबाबदारीने सण साजरा करण्याची वेळ आली आहे, जेणेकरून दिव्यांचा हा उत्सव आपल्या आरोग्यावर कोणतीही वाईट छाया टाकू नये.

Web Title: Effects of post diwali air on lung health experts give simple solution

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 03:12 PM

Topics:  

  • Diwali
  • health issues
  • Lung health

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.