दिवाळीमध्ये गोड तेलकट पदार्थांचे सेवन करून अपचनाच्या समस्या वाढल्या आहेत? मग शरीर डिटॉक्स करण्यासाठी करा 'या' पदार्थांचे सेवन
संपूर्ण देशभरात दिवाळी सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये दिव्यांची आरास, फुलांची सजावट, रांगोळी, फराळातील पदार्थ इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. याशिवाय लक्ष्मी पूजन केले जाते. दिवाळीमध्ये मिठाई, गोड पदार्थ आणि फराळातील पदार्थ मोठ्या प्रमाणावर बनवले जातात. फराळातील लाडू, चकल्या, करंज्या खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. पण दिवाळीमध्ये सतत तिखट, तेलकट आणि गोड पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडते. गोड पदार्थांच्या अतिसेवनामुळे मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. त्यामुळे दिवाळीमध्ये कमीत कमी प्रमाणात मिठाई आणि इतर गोड पदार्थांचे सेवन करावे.(फोटो सौजन्य – istock)
दिवाळीचे पाच दिवस सतत मिठाई आणि फराळातील पदार्थ खाल्ल्यानंतर ऍसिडिटी वाढते आणि पोटात दुखणे, आंबट ढेकर येणे, पित्ताचा त्रास इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. शरीरात वाढलेल्या पित्तामुळे काहीवेळा डोकेदुखीचा त्रास होतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दिवाळी उत्सवात सतत तिखट तेलकट पदार्थांचे सेवन करून शरीर डिटॉक्स करण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील आणि शरीर स्वच्छ होईल.
लिंबाच्या रसात असलेले विटामिन सी शरीरातील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते. यासाठी कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मीठ टाकून सेवन केल्यास आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाईल. पचनाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी लिंबाचा रस अतिशय प्रभावी ठरतो. लिंबाच्या सालीमध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट शरीर डिटॉक्स करण्यासाठी मदत करते. याशिवाय लिंबाच्या आंबट चवीमुळे बाइल ज्यूसचा फ्लो वाढतो आणि पचनक्रिया सुरळीत राहते.
रात्री झोपण्याआधी कोमट पाण्यात एक चमचा धणे टाकून रात्रभर भिजत ठेवावे. त्यानंतर सकाळी उठून उपाशी पोटी पाण्याचे सेवन केल्यास शरीर स्वच्छ होईल. शरीर डिटॉक्स करण्यासाठी फायबर युक्त पदार्थांचे भरपूर सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात. धन्याचे पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि उच्च कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.
शरीराची सिस्टीम चांगली ठेवण्यासाठी टोमॅटो खावा. याशिवाय तुम्ही टोमॅटोचा रस सुद्धा पिऊ शकता. टोमॅटोमध्ये असलेले विटामिन सी त्वचा आणि संपूर्ण आरोग्यासाठी अतिशय गुणकारी ठरते. सण उत्सवाच्या दिवसांमध्ये दुपारच्या जेवणात तेलकट किंवा मसालेदार पदार्थांचे सेवन केल्यास संध्याकाळच्या वेळी टोमॅटो सूप किंवा सॅलड खाऊ शकता.
सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा पिण्याऐवजी ग्रीन टी प्यावी. ग्रीन टी प्यायल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात आणि आरोग्य सुधारते. कोमट पाण्यात ग्रीन टी उकळवून नियमित सेवन केल्यास आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर डिटॉक्स होईल. ग्रीन टी सोबतच तुम्ही हर्बल ड्रिंकचे सुद्धा सेवन करू शकता.
डिटॉक्स वॉटर म्हणजे काय?
हे पाणी आहे ज्यामध्ये लिंबू, काकडी, पुदिना, आणि स्ट्रॉबेरी यांसारखी ताजी फळे, भाज्या आणि औषधी वनस्पती टाकून ते अधिक चवदार आणि पौष्टिक बनवले जाते.
डिटॉक्स वॉटर आणि साधे पाणी यात काय फरक आहे?
डिटॉक्स वॉटरमध्ये नैसर्गिक चवीसाठी फळे आणि भाज्या टाकल्या जातात, तर साधे पाणी प्लेन (plain) असते.
रोज किती डिटॉक्स वॉटर पिणे सुरक्षित आहे?
नियमित साध्या पाण्याप्रमाणेच, तुम्ही दिवसभर गरजेनुसार डिटॉक्स वॉटर पिऊ शकता. तथापि, कोणत्याही गोष्टीचा अतिवापर टाळावा.






