फोटो सौजन्य: iStock
आपण सर्वेच जण कधी ना कधी तणावाखाली येत असतो. पण हा तणाव काही काळासाठीच असेल तर ठीक. अन्यथा याचा परिणाम तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर देखील होऊ शकतो. यातही पुरुष मंडळी महिलांपेक्षा जास्त तणावपूर्ण आयुष्य जगत असतात. याचे कारण म्हणजे त्यांच्या खांद्यावर असणाऱ्या महत्वपूर्ण जबाबदाऱ्या. पण काही अभ्यासानुसार हाच तणाव पुरुषांच्या ‘वडील’ बनण्याच्या मार्गात अडथळा बनू शकतो.
तुमचा स्ट्रेस आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम करतो. याचा विशेषतः पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर म्हणजेच मेल फर्टीलिटीवर खोलवर परिणाम होतो. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की दीर्घकालीन तणावामुळे शुक्राणूंची संख्या आणि एकूण लैंगिक कार्यावर परिणाम होऊन पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो.
यंदा हावई मार्गे करा केदारनाथ यात्रा! IRCTC सेवा तुमच्यासाठी सज्ज; जाणून घ्या भाडे
ताण आणि पुरुष प्रजनन क्षमता यांच्यातील संबंध जाणून घेणे महत्वाचे आहे, कारण पालक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या जोडप्यांसाठी ही गोष्ट खूप महत्वाची असू शकते. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
डॉक्टरांनी सांगितले की तणावाची पातळी वाढत असताना, शरीरातून उच्च पातळीचे कॉर्टिसोल सोडले जाते. हा एक हार्मोन आहे, जो तणावाला शरीरातील नॅचरल रिस्पॉन्सचा एक भाग आहे. वाढलेली कोर्टिसोल पातळी शुक्राणूंच्या उत्पादनात आणि लैंगिक कार्यात सहभागी असलेल्या टेस्टोस्टेरॉनच्या उत्पादनास प्रतिबंध करू शकते.
कमी टेस्टोस्टेरॉन पातळीमुळे शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते, शुक्राणूंची गुणवत्ता खराब होऊ शकते आणि इरेक्टाइल डिसफंक्शन होण्याची शक्यता वाढू शकते. तणाव इतर प्रजनन हॉर्मोन्सच्या संतुलनावर देखील परिणाम करते, ज्यामुळे मेल इनफर्टिलिटी वाढू शकते.
डॉक्टरांच्या मते, दीर्घकाळापर्यंतच्या ताणामुळे अस्वस्थ लाइफस्टाइलच्या सवयी देखील वाढू शकतात. हे खराब आहार, शारीरिक हालचालींचा अभाव, झोपेची कमतरता इत्यादींमुळे असू शकते, ज्यामुळे प्रजनन क्षमता कमी होते. उदाहरणार्थ, तणावामुळे खराब आहार घेतल्याने पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते, ज्यामुळे शुक्राणूंच्या आरोग्याला हानी पोहचते. याव्यतिरिक्त, तणावामुळे अल्कोहोल किंवा तंबाखूचे सेवन वाढू शकते, जे दोन्ही शुक्राणूंची गुणवत्ता आणि उत्पादनास हानी पोहोचवतात.
शिर्डीमध्ये रामनवमी उत्सव मोठ्या जल्लोषात का साजरा केला जातो? जाणून घ्या यामागील पौराणिक कथा
डॉक्टरांनी सांगितले की तणाव कमी करण्याचे मार्ग पुरुषांच्या प्रजनन क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ करू शकतात. व्यायाम आणि इतर शारीरिक हालचालींमुळे कोर्टिसोलची पातळी कमी होते आणि हार्मोनल संतुलन राखण्यास मदत होते. स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणून मेडिटेशन, डायाफ्रामॅटिक ब्रीडिंग आणि इतर माइंडफुलनेस व्यायाम देखील उपयुक्त आहेत. याव्यतिरिक्त, निरोगी आहार, आणि चांगली झोपेमुळे प्रजनन क्षमता वाढू शकते.