Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Reproductive Health: नोकरी करणारी 60% जोडपी टाळतात प्रजनन आरोग्याची तपासणी, गर्भधारणेच्या समस्यांमध्ये होतेय वाढ

सध्या बऱ्याच जोडप्यांना बाळ न होण्याची समस्या येत आहे. वंध्यत्वाची अथवा प्रजननाची ही समस्या वाढत असून त्याची नेमकी कारणं काय आहेत आणि नोकरी करणाऱ्यांना ही समस्या अधिक का? हे आपण समजून घेऊ

  • By दिपाली नाफडे
Updated On: Feb 12, 2026 | 01:49 PM
काय आहे समस्या (फोटो सौजन्य - iStock)

काय आहे समस्या (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • जोडप्यांमध्ये का होत आहे वंधत्व अथवा प्रजननाशी संबंधित समस्या 
  • पुरुष आणि महिलांमध्ये वाढणारी समस्या 
  • काय आहेत कारणं 
हल्ली पुरुष आणि महिलांमध्ये प्रजननाशी संबंधित समस्या वाढत असूनही अनेक जोडपी वेळीच प्रजनन आरोग्य तपासणी करत नाहीत. विशेषतः नोकरी करणाऱ्या जोडप्यांपैकी सुमारे ६० टक्के जोडपी प्रजनन आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे गर्भधारणेच्या अडचणी वाढण्याचा धोका निर्माण होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

प्रजनन समस्या पुरुष आणि महिला दोघांनाही होऊ शकतात. महिलांमध्ये पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (PCOS), एंडोमेट्रिओसिस, थायरॉईड विकार, अंडाशयातील अंड्यांची संख्या किंवा गुणवत्ता कमी असणे अशा समस्या आढळतात. अनेक वेळा या समस्या सुरुवातीला कोणतीही  लक्षणे न आढळून येता हळूहळू वाढतात. काही महिलांमध्ये मासिक पाळीची अनियमितता, ओटीपोटात वेदना किंवा हार्मोनल असंतुलन सारख्या समस्या दिसून येतात, मात्र अनेकांना कोणतीही लक्षणं जाणवत नाहीत. पुरुषांमध्येही शुक्राणूंची संख्या कमी होणे, त्यांची गुणवत्ता कमी होणे किंवा हार्मोनल असंतुलन अशा समस्या आढळून येतात. बहुतेक वेळा गर्भधारणेत समस्या आल्यानंतरच या समस्यांकडे गांभीर्याने पाहिले जाते. त्यामुळे वेळीच प्रजनन तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे.

लैंगिक व प्रजनन आरोग्य जागरूकता दिन 2026: सुदृढ भविष्याकरिता घ्या प्रजनन आरोग्याची काळजी, काय सांगतात तज्ज्ञ

काय सांगतात तज्ज्ञ

मुंबईतील अपोलो डायग्नोस्टिक्स च्या रिजनल टेक्निकल हेड डॉ. उपासना गर्ग यांनी सांगितले की, प्रजनन तपासणी ही केवळ एखादी आरोग्य समस्या निर्माण झाल्यावरच करायची असे नसून नियमितपणे ही तपासणी करणे गरजेचे आहे. महिलांसाठी ओव्हुलेशन ट्रॅकिंगद्वारे अंडी नियमितपणे तयार होऊन ती फुटत आहेत का हे तपासले जाते. हार्मोनल चाचण्यांमध्ये एएमएच, एफएसएच, एलएच, प्रोलॅक्टिन आणि थायरॉईड प्रोफाइलद्वारे स्त्रीबीजांची संख्या व गुणवत्ता समजते. तसेच अल्ट्रासाऊंडसारख्या तपासण्यांद्वारे गर्भाशय व फॅलोपियन ट्यूबमध्ये काही अडचण आहे का हे तपासले जाते. पुरुषांसाठी वीर्य तपासणीद्वारे शुक्राणूंची संख्या, हालचाल आणि त्यांची रचना तपासली जाते. या सर्व चाचण्यांमुळे वेळीच योग्य त्या समस्येचे निदान करण्यास मदत होते.

नोकरी करणाऱ्या जोडप्यांमध्ये अधिक समस्या 

तज्ज्ञांनी पुढे सांगितले की, २५ ते ३७ वयोगटातील जवळपास १० पैकी ६ नोकरी करणारी जोडपी प्रजनन तपासणीस विलंब करतात. यापैकी सुमारे ४० टक्के जोडप्यांना वंध्यत्वाशी संबंधित अंतर्निहित समस्या असू शकतात. अशा जोडप्यांना आयव्हीएफ, आयसीएसआय किंवा आयुआय सारख्या सहाय्यक उपचारांची गरज भासू शकते. वेळीच तपासणी केल्यामुळे नैसर्गिक गर्भधारणेची शक्यता वाढते, भावनिक ताण कमी होतो आणि पुढील गुंतागुंत टाळता येते.

40 नंतरही मजबूत करतील Fertility ‘हे’ 5 पदार्थ, महिला आणि पुरुषांनी आहारात समाविष्ट कराच

प्रजननाबाबत योग्य माहिती नसणे 

मुंबईच्या झायनोवा शाल्बी हॉस्पिटलचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. परिक्षित टँक यांनी सांगितले की, बऱ्याच नोकरी करणाऱ्या जोडप्यांना प्रजनन आरोग्याबाबत पुरेशी माहिती नसते. व्यस्त जीवनशैलीमुळे तपासणीस विलंब होतो, मात्र वय आणि जीवनशैलीचे घटक आपल्या प्रजननक्षमतेवर परिणाम करतात. 

त्यांच्या मते, जोडप्यांनी हार्मोन चाचण्या, अल्ट्रासाऊंड, ओव्हेरियन रिझर्व तपासणी आणि वीर्य विश्लेषण या मूलभूत तपासण्या वेळीच करुन घेणे गरजेचे आहे. यामुळे त्यामुळे वेळीच समस्या ओळखता येते आणि आहार, व्यायाम, योग, ध्यान तसेच आवश्यक उपचारांद्वारे योग्य नियोजन करता येते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, नियमित आरोग्य तपासणीप्रमाणेच प्रजनन तपासणी  ही देखील तितकीच महत्त्वाची आहे. वेळीच तपासणी केल्यास गर्भधारणेची शक्यता वाढते आणि मानसिक ताण कमी होतो.

Web Title: 60 percent of working couples avoid reproductive health check ups increasing pregnancy problems

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 01:49 PM

Topics:  

  • Health Tips
  • infertility
  • male infertility

संबंधित बातम्या

Fitness Tips : जिम लावली नाही तरीही २ वर्षांत १८ किलो वजन केले कमी, तरुणीने शेअर केला सीक्रेट फिटनेस प्लॅन
1

Fitness Tips : जिम लावली नाही तरीही २ वर्षांत १८ किलो वजन केले कमी, तरुणीने शेअर केला सीक्रेट फिटनेस प्लॅन

दिवसभर शरीराला हायड्रेड ठेवण्यासाठी नक्की किती पाण्याचे सेवन करावे? योग्य प्रमाण जाणून घ्या
2

दिवसभर शरीराला हायड्रेड ठेवण्यासाठी नक्की किती पाण्याचे सेवन करावे? योग्य प्रमाण जाणून घ्या

Women Libido: महिलांचे लिबिडो वाढवून शारीरिक संबंध सुधारण्यासाठी वरदान ठरते मेथी, जाणून घ्या फायदे
3

Women Libido: महिलांचे लिबिडो वाढवून शारीरिक संबंध सुधारण्यासाठी वरदान ठरते मेथी, जाणून घ्या फायदे

आता बायोप्सीची गरज कमी होणार? लाळ आणि स्वॅबमधून ओरल कॅन्सरची प्राथमिक तपासणी शक्य
4

आता बायोप्सीची गरज कमी होणार? लाळ आणि स्वॅबमधून ओरल कॅन्सरची प्राथमिक तपासणी शक्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.