चहा पिण्याची नक्की वेळ कोणती आहे काय होतो शरीरावर परिणाम
झोपेतून उठल्यानंतर शरीराला निरोगी नाश्ता आवश्यक असतो. सोबत एक कप कडक चहा मिळाला तर आनंद होतो. काही लोकांना चहा इतका आवडतो की त्यांना सकाळी उठल्याबरोबर दुधाचा चहा त्यांना हवा असतो. भारतातील जवळपास 99 टक्के लोक सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यासोबत चहा पितात. चहा पिण्याची ही चुकीची वेळ आहे असं जर तुम्हाला सांगितलं तर? हे नक्कीच तुमच्यासाठी खूप धक्कादायक असेल. लोक चहा बनवताना हानिकारक गोष्टी जोडतात. त्यामुळे चहाने होणारे नुकसान आणखी वाढते.
या प्रकारच्या चहामुळे कुपोषण होऊ शकते हे अनेकांना माहीत नाही. अमेरिकेत राहणारे हेमॅटोलॉजिस्ट ऑन्कोलॉजिस्ट डॉ. रवी के गुप्ता यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे. रिकाम्या पोटी प्यायलेला चहा वृद्धांसाठीही खूप घातक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. याचा हृदयावर वाईट परिणाम होतो आणि दीर्घकाळ अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. चला तर मग चहाऐवजी काय प्यावे, चला जाणून घेऊया.
दुधाचा चहा पिण्याने नुकसान
दुधाचा चहा पिण्याने नक्की काय नुकसान होते जाणून घ्या
चहामध्ये दूध नसेल तर मजा येत नाही आणि अनेकांना सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहाच प्यायला हवा असतो. पण दुधासोबत चहा अजिबात पिऊ नये. बहुतेक लोक चहा बनवताना ही चूक करतात. असा चहा प्यायल्याने अन्नातून लोह मिळत नाही आणि ॲनिमियाचा धोका वाढू शकतो असे डॉक्टर सांगतात.
सतत चहा पिण्याची सवय आहे? मग वेळीच व्हा सावध, जाणून घ्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
कुपोषणाचा होऊ शकतो त्रास
अवेळी चहा पिण्याने होते कुपोषण
चुकीच्या वेळी चहा प्यायल्याने कुपोषण होऊ शकते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, तुम्ही ज्या पोषक तत्वांसह चहा पिता ते शरीरात पोहोचत नाहीत. त्यामुळे अशक्तपणा, थकवा, दम लागणे आदी समस्या उद्भवू शकतात आणि यामुळे काही लोकांना कुपोषणाच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. बरेचदा लहान मुलांना चहाची सवय लावल्यास त्यांना या समस्येला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे अशी सवय लहान मुलांना न लावणे चांगले.
ब्लोटिंग आणि ॲसिडिटीचा त्रास
पोट फुगणे आणि पचनाचाही होतो त्रास
सकाळचा चहा शरीराचे खूप नुकसान करतो असे डॉक्टर सांगतात. रिकाम्या पोटी प्यायल्याने ॲसिडचे उत्पादन वाढते. यामुळे पोटाला आतून नुकसान होऊ शकते आणि आम्लपित्त आणि सूज येऊ शकते. वारंवार चहा प्यायल्याने हृदयाची गती वाढते आणि बीपी अर्थात ब्लड प्रेशरदेखील वाढते जे हृदयाच्या आरोग्यासाठी वाईट आहे.
चहाऐवजी काय प्यावे
दुधाचा चहा न पिता काय प्यावे
दुधासोबत चहाऐवजी इतर पेये प्यावीत. तुळशीचा चहा, ग्रीन टी आणि कॅमोमाइल टी सारख्या हर्बल टी पचन आणि रोगप्रतिकार शक्तीसाठी उत्तम आहेत. तुम्ही मसाला चहा आणि काळ्या चहासारखा दुधाशिवाय चहा पिण्याचा पर्यायदेखील निवडू शकता. ग्रीन टी पिण्याने तुमच्या शरीराला हानी पोहचत नाही
चहा बनवताना मिक्स करा किचनमधील 5 पदार्थ, अमृतापेक्षाही लागेल चविष्ट विसराल नॉर्मल Tea
चहा नक्की कधी प्यावा
चहा कोणत्या वेळी पिणे योग्य आहे
चहा नेहमी सकाळी उठल्यावर योग्य नाश्ता केल्यानंतरच प्यावा. त्यामुळे नाश्त्यातील पोषक तत्व सहज उपलब्ध होतात किंवा चहा पीत असताना, हेल्दी स्नॅक घ्या. रिकामा चहा पोटासाठी खूप हानिकारक आहे असेही डॉक्टरांनी आपल्या सोशल मीडिया इन्स्टाग्राम हँडलवर सांगितले आहे.
काय सांगतात डॉक्टर
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.