मसाला चहा कसा बनवावा
हळूहळू थंडीला आता सुरूवात झाली आहे. थंड हवामान खाद्यप्रेमींसाठी वरदानापेक्षा कमी नसले तरी, ज्यांना वारंवार थंडीचा त्रास होतो त्यांच्यासाठी ते धोकादायकदेखील आहे. चवदार मसाला चहा पिऊन तुम्ही केवळ विषाणूजन्य, सर्दी किंवा अॅलर्जीमुळे होणाऱ्या समस्यांनाच अलविदा म्हणू शकत नाही तर कामानंतरच्या थकव्यालाही अलविदा करू शकता. अर्थात आम्ही मसाला चहाबद्दल बोलत आहोत.
लवंग, तमालपत्र, तुळशीची पाने, ओवा, काळी मिरी आणि आलं चहामध्ये मिक्स करणे खूप फायदेशीर आहे. आयुर्वेदानुसार या मसाल्यांचा वापर करून बनवलेला चहा हिवाळ्यासाठी रामबाण उपाय ठरू शकतो. हा चहा केवळ चविष्टच नाही तर शरीराच्या आत होणारे संक्रमण हाणून पाडण्यासाठी आणि शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठीही उपयुक्त ठरतो. कसा बनवावा घरीच मसाला चहा, जाणून घ्या रेसिपी आणि मसाला चहाचे आरोग्यासाठी काय फायदे होतात त्याबाबत माहिती (फोटो सौजन्य – iStock)
मसाला चहाची रेसिपी
साखर आणि चहाची पाने उकळत्या पाण्यात मिक्स करा आणि त्यात आलं, काळी मिरी, ओवा, तमालपत्र आणि लवंग एकत्र मिक्स करून जास्त वेळ उकळू द्या. त्यातील घटक व्यवस्थित पाण्यात मिसळतात. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तुमच्या आवडीनुसार या मसाल्यांचा वापर करून ब्लॅक टी किंवा दुधाचा चहा बनवू शकता. या मसाला चहामुळे तुमच्या शरीरातील प्रतिकारशक्ती हमखास वाढण्यास मदत मिळते. जाणून घेऊया या मसाल्यांचे फायदे नक्की काय आहेत आणि याचा शरीराला कसा फायदा मिळतो
दिवसभरात किती वेळा चहा पिणे योग्य? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
मसाल्यांचे फायदे
दैनंदिन आहारात दुधाचा चहा पिण्याऐवजी नियमित प्या मॅचा बोबा चहा, शरीराला होतील आशचर्यकारक फायदे
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.