३ tblsp कॉर्न फ्लॉवर, ३ tblsp तेल आणि चवीनुसार मीठ.
चटणीचे साहित्य
३०/४० पुदिन्याची पाने
छोटी मूठ कोथिंबीर
५ हिरव्या मिरच्या
२ tblsp लिंबाचा रस
६ लसूण पाकळ्या
½” आले
१ tsp मीठ.
कृती
प्रथम आले, लसूण, मिरची कोथिंबीर याचे बारीक वाटण वाटून घ्यावे. त्यानंतर पॅनमध्ये तेल गरम करून त्यात तयार वाटणातील २ चमचे वाटण तेलात परतून घ्यावे.
त्यानंतर यात पातीचा कांदा, १½ tblsp घरगुती लाल मसाला, १ tsp हळद आणि चवीनुसार मीठ घालून चांगले एकजीव करून घ्यावे. त्यानंतर यात कर्दी घालून एकजीव करावी.
आता वर झाकण ठेवून ७/८ मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावी. ( मध्ये मध्ये थोडे परतून घ्यावे. ) एका बाजूला चटणीचे साहित्य एकत्र मिक्सरला फिरवून बारीक चटणी वाटून घ्यावी.
आता कर्दीमध्ये १ tblsp लिंबाचा रस घालून एकजीव करावी आणि त्यानंतर गॅस बंद करून घ्यावा. आता प्रत्येक बोंबील लाटण्याने हलका दाब देऊन लाटून घ्यावा जेणेकरून मधला त्याचा काटा मोडला जाईल.
आता उरलेल्या वाटणामध्ये १ tsp हळद, २½ tblsp घरगुती लाल मसाला, १ tblsp लिंबाचा आणि चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य चांगले एकजीव करून घ्या आणि तयार मिश्रण बोंबलांना चांगले चोळून घ्या.
आता बोंबीलच्या वरच्या बाजूवर तयार कर्दी पसरून घाला आणि त्याचा रोल तयार करून घ्या. तयार रोल टूथ पीकच्या साहाय्याने बंद करून घ्या जेणेकरून बोंबील तेलात तळताना सुटणार नाही.
त्यानंतर एका प्लेटमध्ये मैदा, रवा, कॉर्न फ्लॉवर, १ tblsp लाल मिरची पावडर, १ tsp हळद आणि १ tsp मीठ घालून सर्व साहित्य एकजीव करा आणि या मिश्रणात बोंबील चांगले घोळून घ्या.
आता कढईत तेल गरम करून त्यात बोंबील कुरकुरीत होई पर्यंत मध्यम आचेवर तळून घ्या. बोंबील रोल गरम असतानाच पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.
Web Title: Fancy stuffed bombil rolls it is crispy in restaurant style nrrd