Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सणाची सुरुवात गोडाने करा, घरी बनवा चवदार गाजराची बर्फी, पारंपरिक रेसिपी नोट करा

लवकरच गणेश चतुर्थी येणार आहे. या गोड प्रसंगी तुम्ही तुमच्या घरी काही गोडाचे बनवून हा दिवस आणखीन खास करू शकता. आज आम्ही तुमच्यासोबत गाजराच्या बर्फीची रेसिपी शेअर करत आहोत. गाजराचा हलवा तर तुम्ही अनेकदा बनवला असेल यावेळी गाजराची बर्फी ट्राय करून पहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 27, 2024 | 01:54 PM
सणाची सुरुवात गोडाने करा, घरी बनवा चवदार गाजराची बर्फी, पारंपरिक रेसिपी नोट करा

सणाची सुरुवात गोडाने करा, घरी बनवा चवदार गाजराची बर्फी, पारंपरिक रेसिपी नोट करा

Follow Us
Follow Us:

सणसमारंभ असलं की आपल्याकडे गोडाचे पदार्थ आवर्जून बनवले जातात. कोणत्याही चांगल्या प्रसंगी गोड पदार्थाने आपले तोंड गोड करण्याची आपली फार जुनी संस्कृती आहे. आता लवकरच गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहेत. या गोड सणानिमित्त तुम्ही घरी काहीतरी गोड बनवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही गाजराच्या बर्फीचा विचार करू शकता.

गाजर आरोग्यासाठी फार फायदेशीर असतो. सध्या पावसाळा ऋतू सुरु आहे या ऋतूत गाजर बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. अशात हा पदार्थ देवाच्या प्रसादासाठी एक उत्तम पर्याय ठरेल. गाजराचा हलवा तर तुम्ही अनेकदा बनवून खाल्ला असेल मात्र यावेळी गाजराची चविष्ट बर्फी बनवून पहा. ही बर्फी घरातील सर्वांनाच फार आवडेल. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हेदेखील वाचा – तूर आणि वालापासून बनवा चमचमीत मसाला खिचडी, अवघ्या 10 मिनिटांतच तयार होईल रेसिपी

साहित्य

  • 1/2 किलो किसलेले गाजर
  • 1 कप साखर
  • 1 कप दुध
  • 1/2 कप बारीक रवा
  • 1/2 कप मिल्क पावडर
  • 1/2 चमचा वेलची पूड
  • सुक्यामेव्याचे काप आवडीनुसार
  • तूप

कृती

  • गाजराची बर्फी बनवण्यासाठी सर्वप्रथम गाजर स्वछ पाण्याने धुवा आणि याची साल काढून घ्या
  • यानंतर गाजर नीट किसून घ्या
  • आता गॅसवर एक कढई ठेवा आणि यात तूप टाका
  • यानंतर या तुपात रवा टाका आणि मंद आचेवर खमंग वास येईपर्यंत परतून घ्या आणि मग एका प्लेटीत काढून घ्या
  • आता पुन्हा एक कढई गॅसवर ठेवा आणि यात तूप टाका
  • यानंतर यात गाजराचा किस घाला आणि मंद आचेवर परतत रहा, याला छान सात,आठ मिनीटे परतुन छान वाफ येऊ द्या
  • आता यामध्ये दूध घालुन, पुर्ण दुध आटेपर्यंत शिजु द्या
  • नंतर यात साखर घाला आणि साखर विसरघळली की यात भाजेलेला रवा, मिल्क पावडर घाला आणि मिक्स करा
  • मंद आचेवर सर्व साहित्य नीट शिजू द्या, छान एकत्र घट्ट होऊ द्या
  • शेवटी यात वेलची पूड घाला आणि नीट एकजीव करा
  • आता एका ताटात तूप टाकून ग्रिसींग घ्या आणि यात तयार मिश्रण टाकून नीट पसरवून घ्या
  • यांनतर यावर सुक्या मेव्याचे काप पसरवा आणि थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवून द्या
  • काही तासांनी फ्रिजमधून याला काढा आणि याच्या वड्या पाडून घ्या
  • अशाप्रकारे तुमची चवदार गाजराची बर्फी तयार होईल

Web Title: Easy recipe of a carrot barfi to celebrate festival

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2024 | 01:54 PM

Topics:  

  • food recipe

संबंधित बातम्या

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी
1

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
2

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
3

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.