फोटो सौजन्य- istock
जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायची असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात आरोग्यदायी आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करू शकता.
मधुमेहाला सायलेंट किलर डिसीजदेखील म्हटले जाते. कारण, डायबेटिस जगभर वेगाने पसरत आहे. खरं तर, मधुमेहावर कोणताही ज्ञात उपचार नाही, जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमध्ये बदल करून तो बऱ्याच प्रमाणात नियंत्रित केला जाऊ शकतो. मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या खाण्याच्या सवयींची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. कारण, मधुमेहाच्या रुग्णांना गोड पदार्थ आणि पिठापासून बनवलेल्या वस्तू खाण्यास मनाई आहे. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायची असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात आरोग्यदायी आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करू शकता. या गोष्टींचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.
मधुमेहाच्या रुग्णांनी काय खावे?
चेरी
चेरी एक स्वादिष्ट आणि तब्येतीसाठी चांगले फळ आहे. मधुमेहाचे रुग्ण चेरी खावू शकतात. कारण, चेरीचा GI स्कोअर फक्त 20 आहे. चेरीमध्ये कॅलरीज कमी असतात परंतु भरपूर जीवनसत्त्वे असतात.
संत्री
संत्री मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगली मानली जाते. संत्र्याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. व्हिटॅमिन सी समृद्ध संत्र्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
सफरचंद
सफरचंद हे एक फळ आहे जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. सफरचंदांमध्ये फ्रक्टोज, पॉलिफेनॉल आणि अँथोसायनिन्स असतात जे मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत करतात.
गाजर
गाजर ही एक भाजी आहे जी आपण आपल्या आहारात अनेक प्रकारे समाविष्ट करू शकतो. यामध्ये असलेले गुणधर्म मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात.
पालक
मधुमेहाच्या रुग्णांसाठीही पालकाचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते. कारण त्याचा GI स्कोअर खूपच कमी आहे.