सकाळचा नाश्ता म्हटला की, पराठा हा पदार्थ आठवणे साहजिक आहे. मसालेदार स्टफिंग आणि मऊदार पिठात लपेटलेला पराठा अनेकांच्या आवडीचा नाश्ता आहे. आता पराठे अनेक प्रकारे बनवले जातात जसे की आलू पराठा, प्याज पराठा, मसाला पराठा मात्र तुम्ही कधी दुधी भोपळ्याचा पराठा खाल्ला आहे का? नसेल तर आजची ही सोपी रेसिपी पहा आणि त्वरित बनवून याचा आस्वाद घ्या.
दुधीपासून तयार केला जाणारा हा पराठा चवीला तर अप्रतिम लागतोच शिवाय आरोग्यासाठीही फार पौष्टिक मानला जातो. तुम्हाला दुधी खायला आवडत नसेल तर एकदा तरी तुम्ही याचा पराठा करून खायला हवा. आम्हाला खात्री आहे, तुम्ही एकदा या पदार्थाची चव चाखली तर बोट चाटून पुसून याचा आनंद लुटाल. हा पराठा बनवण्यासाठी फार वेळ लागत नाही. त्यामुळे चला अजिबात वेळ न दवडता यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – मैदा नाही तर यावेळी साबुदाण्यापासून तयार करा मोमो, व्हायरल रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा
हेदेखील वाचा – चवीबरोबरच पौष्टिकतेची भर! लहान मुलांसाठी घरी बनवा मूग सँडविच, झटपट तयार होते रेसिपी