पितृ पक्षात आवर्जून बनवली जाते खीर, यामागचे कारण आणि रेसिपी जाणून घ्या
हिंदू पंचांगानुसार, यावर्षी पितृपक्ष 17 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. तसेच याचा समारोप 2 ऑक्टोबर रोजी होणार आहे. पितृपक्षात आपले पितर पृथ्वीवर येतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात अशी मान्यता आहे. असे मानले जाते की पितृ पक्षात पितर पृथ्वीवर येतात आणि आशीर्वाद देतात. या वेळी आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी लोक तर्पण, पिंडदान आणि ब्राह्मण भोजन करतात. श्राद्धात प्रसादाशी संबंधित काही खास नियम आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे. असाच एक नियम खिर बनवण्याबाबत देखील पाळला जातो. पितृ पक्षाच्या जेवणात खीर आवर्जून बनवली जाते. या दिवशी खिरीला इतके का महत्त्व दिले जाते? यामागचे कारण आणि रेसिपी जाणून घेऊयात.
घरी आलेल्या पाहुण्याला गोड पदार्थ खाऊ घातल्याने पाहुण्याला पूर्ण तृप्तीचा अनुभव येतो, असे मानले जाते. याच उद्देशाने पितरांच्याही तृप्तीसाठी खीर बनवण्याची पद्धत आहे. त्याचबरोबर श्राद्धात खीर बनवण्यामागचे आणखीनए एक कारण असे सांगितले जाते की, श्राद्ध पक्षाच्या आधीचा काळ पावसाचा असतो. पूर्वीच्या काळी पावसामुळे लोक आपला बराचसा वेळ घरातच उपवास करण्यात घालवत असतात. ज्यामुळे त्यांचे शरीर कमकुवत व्हायचे. अशा तऱ्हेने पितृ पक्षाचे 16 दिवस खीर-पुरी खाऊन आपल्या शरीराला ऊर्जा देत असत.
हेदेखील वाचा – चहाची मजा द्विगुणित करेल टोमॅटो चीज सँडविच, नोट करा साहित्य आणि कृती
हेदेखील वाचा – बाजारातील इडली सोडा! आता घरीच बनवा सॉफ्ट आणि स्पॉंजी इडली, या स्टेप्स फॉलो करा