
प्रसादाचा शिरा
आज शनिवार, हा दिवस शनिदेवाला समर्पित केला जातो. पौराणिक मान्यतेनुसार, धर्मराज म्हणून शनिदेवांना ओळखले जाते. शनिवारच्या दिवशी शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी अनेकजण पूजा-अर्चा करत असतात. या दिवशी कोणी पूजा करतं, कोणी अन्नदान करतं तर कोणी प्रसाद बनवून शनिदेवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतं. आज आम्ही तुम्हाला शनिदेवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या एका फळाविषयी सांगत आहोत. हे फळं फार गुणकारी असून यापासून तुम्ही प्रसादाचा शिरा बनवू शकता. हा प्रसाद तुम्ही शनिदेवाला दाखवल्यास तुमच्यावर सदैव त्यांची कृपा राहील. या फळाचे नाव आहे बेलफळ. हे फळ आरोग्यासाठी फार फायदेशीर असते. चला तर जाणून घेऊयात यापासून बनवल्या जाणाऱ्या शिऱ्याची खास रेसिपी.