रेसिपी
सकाळचा नाश्ता हा पोट भारण्यासाठीच नाही तर दिवसभर शरीराला ऊर्जा देण्यासाठी सुद्धा केला जातो. मात्र अनेकजण सकाळी किंवा संध्याकाळी नाश्ता बनवायला कंटाळा करतात. मात्र यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. सकाळचा नाश्ता हा आपल्या आरोग्यसाठी फार गरजेचा असतो. त्यातही हा सकाळचा नाश्ता पौष्टिक असला तर सोनेपे सुहागा! आज आम्ही तुम्हाला अशाच एका पौष्टिक नाश्त्यासाठीची एक रेसिपी सांगत आहोत. हा पदार्थ तुम्ही स्नॅक्स अथवा नाश्ता दोन्हीसाठी खाऊ शकता.
हेल्दी म्हटलं की, ओट्स हे नाव समोर येते. मात्र ओट्स हा पदार्थ गाडीचं मिळमिळीत लागतो. मात्र आजची ही रेसिपी अगदी चविष्ट आणि आरोग्यदायी आहे. आज आम्ही तुम्हाला ओट्सच्या लाडूंची एक अनोखी रेसिपी सांगत आहोत. हे लाडू चवीला तर उत्तम आहेतच मात्र शरीरसाठीही आरोग्यदायी आहेत. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पालक थालीपीठ, लहान मुलं आवडीने खातील