नाश्त्यासाठी झटपट बनवा पालक थालीपीठ
लहान मुलांना पालेभाज्या खायला अजिबात आवडत नाही. हिरव्या भाज्या खाण्यास दिल्यानंतर बरीच मुलं नाक मुरडतात. पण या भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम आणि प्रोटीन असते. पालक, मेथी,माठ,आंबाडी यांसारख्या भाज्यांचा आहारात समावेश केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. हिरव्या पालेभाज्या खाल्ल्यामुळे केसांचे आरोग्य सुधारून त्वचेला सुद्धा फायदे होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी पालक थालीपीठ कसे बनवायचे याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ झटपट तयार होतो आणि लहान मुलांनासुद्धा नक्की आवडेल. कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारे पदार्थ सर्वच महिला शोधत असतात.त्यामुळे घाईगडबडीच्या वेळी तुम्ही पालकाचे थालीपीठ नक्की बनवू शकता.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: तूप खाण्याचे त्वचेसाठी फायदे