फोटो सौजन्य: raja_mumbaicha/X.com
गणेशोत्सवात महाराष्ट्राचे वेगळे रूप पाहायला मिळते. मुंबईत तर गणेशोत्सवानिमित्त दिवाळीच साजरी होत असते. ठिकठिकाणी बाप्पाच्या आगमानंतर आनंदाचे वातावरण निर्माण होते. मुंबईतील लालबाग आणि परळचा परिसर तर अक्षरशः गणेश भक्तांच्या गर्दीने दुमदुमून निघतो.
लालबाग परिसरात अनेक नावाजलेले मंडळं आहेत. असेच एक मंडळं म्हणजे गणेशगल्लीतील लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ जिथे विराजमान आहे मुंबईचा राजा. रोज हजारोंच्या संख्येने भाविक मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात. बोल बोल बोल 22 फूट वाले की जय म्हणत मुंबईच्या राजाचा जयघोष करतात. मात्र, आज मुंबईच्या राजाशी निगडित एका विशेष प्रथेबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
पुण्यात मानाचे 5 गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होत नाही तोवर इतर मंडळाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन होत नाही. हे तर आपण सगळेच जाणतो. मात्र, मुंबईतील गणेशगल्लीत देखील अशीच एक प्रथा आहे. जोपर्यंत मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ होत नाही तोपर्यंत मुंबईतील इतर मंडळाचे गणपती बाप्पांचे विसर्जन होत नाही. म्हणूनच तर मुंबईचा राजाची विसर्जन मिरवणूक सकाळी 8 वाजता चालू होते. ही प्रथा 1977 सालापासून सुरु झाली आहे.
दरवर्षी, गणेशगल्लीचे मंडळ नवीन देखावे बनवत असते. 2025 मध्ये, मंडळाने तामिळनाडूतील प्रतिष्ठित रामेश्वरम मंदिराचा देखावला उभारला आहे, जी भाविकांना दक्षिण भारतीय मंदिराचा दिव्य अनुभव देते. गेल्या वर्षी, मंडळाने उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराचा देखावा उभारला होता.