एक वाटी साखरेने आरशासारखा लख्ख चमकेल चेहरा, गणेश चतुर्थीनिमित्त घरच्या घरी ट्राय करा हा नॅचरल स्क्रब
महाराष्ट्राच्या लाडक्या सणाची तयारी सर्वत्र जोरदार सुरु आहे. आता अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आला आहे. बाप्पाच्या आगमनाची सर्वांना उत्सुकता लागली असून गणेशाच्या आगमनाच्या तयारींना सुरुवात झाली आहे. आता सण म्हटलं की सजणं नटणं आलंच. सणाच्या उत्साहात प्रत्येकजण वेगवेगळा लूक करून आपल्याला सर्वोत्तम दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. या सणाच्या काळात कुटुंबीय आणि मित्रांसोबत वेळ घालवताना तसेच फोटो काढताना सुंदर आणि ताजेतवाने दिसावे असा सर्वांना प्रयत्न असतो. मात्र दैनंदिन धावपळ आणि कामामुळे आपल्या चेहरा निस्तेज आणि थकलेला दिसू लागतो.
आम्ही तुम्हाला सांगतो की, गणेशोपासवाच्या या काळात स्वतःला ताजेतवाने आणि उत्साही दाखवण्यासाठी आणि आपला चेहरा उजळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती सोपे आणि प्रभावी उपाय करून पाहू शकता. आपल्या स्वयंपाक घरात अगदी सहज उपलब्ध असलेल्या काही पदार्थांपासून तुम्ही आपल्या चेहऱ्याची निगा राखू शकता. चला तर मग नैसर्गिक स्किन केअर टिप्स जाणून घ्या.
हेदेखील वाचा – गांजा पिणाऱ्यांना कळतच नाही नक्की मेंदूत काय होतंय? यामागील विज्ञान काय सांगतं
लिंबू आणि साखर हे उत्तम स्क्रबिंग एजंट्स आहेत. लिंबामध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी’मुळे त्वचा उजळते आणि टॅनिंगची समस्या दूर होते. याशिवाय साखरेने चेहऱ्यावर स्क्रबिंग केल्याने त्वचेवरील मृत पेशी निघून जातात. आता हा स्क्रब तयार करण्यासाठी सर्वप्रथम एक चमचा साखर आणि त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस टाका. दोन्ही गोष्टी नीट एकत्र करा आणि हलकेच चेहऱ्यावर घासा. 5-7 मिनिटे चेहऱ्याला याने स्क्रब केल्यानंतर चेहरा पाण्याने धुवून काढा. लिंबातील आम्ल चेहऱ्यावरील डेड स्किन काढून टाकते आणि त्वचा उजळवण्यास मदत करते.
यासाठी दोन चमचे तांदळाचे पीठ घ्या आणि त्यात दोन चमचे टोमॅटो रस टाकून नीट एकत्रित करून घ्या. मग चेहऱ्यावर ही पेस्ट लावा आणि 10-15 मिनिटे तसेच राहू द्या. तांदळाचे पीठ त्वचेला स्वछ करून मऊ बनवते तर टोमॅटोच्या रसात असलेले अँटिऑक्सिडंट्स त्वचेला ताजेतवाने ठेवण्यास मदत करतात .
हेदेखील वाचा – ऑफिसाला जाण्याआधी सुंदर चेहरा हवा आहे? मग ‘हा’ फेसपॅक वाढवेल त्वचेची चमक
टोमॅटो आणि साखरेच्या मिश्रणाचा वापर त्वचेला उजळवण्यासाठी आणि मऊ बनवण्यासाठी करता येऊ शकतो. टोमॅटोमध्ये असलेल्या नैसर्गिक घटकांमुळे त्वचा उजळवण्यास मदत होते. तर साखरेचे कण स्क्रबिंग म्हणून काम करते. यासाठी एक चमचा साखर आणि यात अर्धा चमचा टोमॅटो रस टाका आणि मिक्स करा. यानंतर हे मिश्रण हलकेच चेहऱ्यावर घासा आणि नंतर चेहरा पाण्याने धुवून टाका. या स्क्रबचा नियमित वापर केल्यास चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होते.
लिंबू, मध आणि साखरेचा स्क्रब त्वचेला स्वछ, मऊ आणि नितळ करण्यास मदत करते. लिंबामधील व्हिटॅमिन सी त्वचेला उजळवते, मध त्वचेला आद्रता प्रदान करते आणि साखरेचे कण त्वचेला एक्सफोलिएट करतात. आता स्क्रब तयार करण्यासाठी प्रथम एक चमचा लिंबाचा रस, एक चमचा साखर आणि एक चमचे मध घेऊन सर्व साहित्य नीट एकत्रित करा आणि पेस्ट चेहऱ्यावर लावा. मग 10 मिनिटांनी चेहरा नीट पाण्याने स्वछ करा.