Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gauri Visarjan 2026: गौरी विसर्जनाआधी हे नक्की वाचा! ‘या’ 7 गोष्टींची विशेष काळजी घ्या

Gauri Visarjan 2026: गौरी विसर्जनाच्या वेळी उत्तरपूजा करून नैवेद्य दाखवणे, वाण देणे आणि गौरीचे दागिने सुरक्षितपणे काढणे अशा पारंपरिक प्रथा अनेक कुटुंबांमध्ये पाळल्या जातात. मात्र, या प्रथा प्रदेश आणि कुटुंबाच्या परंपरेनुसार बदलू शकतात. त्यामुळे आपल्या घरच्या परंपरेनुसार विधी करणे योग्य ठरेल.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 19, 2026 | 12:35 PM
Gauri Visarjan 2026: गौरी विसर्जनाआधी हे नक्की वाचा! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Gauri Visarjan 2026: गौरी विसर्जनाआधी हे नक्की वाचा! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • १९ सप्टेंबर २०२६ रोजी ज्येष्ठा गौरी विसर्जन; मुंबई पंचांगानुसार तिथी दुपारी ३:२६ पर्यंत.
  • विसर्जनापूर्वी उत्तरपूजा, नैवेद्य आणि वाण देण्याची परंपरा अनेक ठिकाणी पाळली जाते.
  • गौरीच्या मुखवट्यावरील दागिने विसर्जनापूर्वी काढून सुरक्षित ठेवण्याची काळजी घ्या.
सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. ढोल ताशे, आरत्या, मोदकाचा वास सगळीकडेच उत्साह आहे. आज गणेशोत्सवाचा सहावा दिवस आहे. अनेकांच्या घरी गौरी आवाहन झालं, दोन दिवस गौरीची मनोभावे पूजा झाली आणि आज अनेक ठिकाणी गौरी विसर्जन होणार आहे. गौरीला निरोप देताना प्रत्येकाच्या मनात थोडं वाईट वाटत असतं. पण हा निरोप पण तितक्याच थाटात आणि नियम पाळून दिला पाहिजे. गौरी विसर्जनाच्या वेळी काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर विसर्जन अगदी व्यवस्थित पार पडतं. Gauri Visarjan 2026:

आजचा शुभ मुहूर्त काय आहे?

गौरी पूजनाच्या तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन केलं जातं. आज 19 सप्टेंबर 2026 आहे आणि आजच गौरी विसर्जनाचा दिवस आहे. पंचांगानुसार आजचा शुभ काळ सकाळी 6 वाजून 27 मिनिटांपासून ते संध्याकाळी 6 वाजून 38 मिनिटांपर्यंत आहे. पण यात पण सगळ्यात चांगली वेळ म्हणजे सकाळी सूर्योदयापासून ते दुपारी 3 वाजून 15 मिनिटांपर्यंत. कारण 3.15 नंतर मूळ नक्षत्र संपत आहे. त्यामुळे दुपारच्या आत विसर्जन करणं जास्त चांगलं मानलं जातं. त्यामुळे दुपारी 3.15 च्या आत गौरीची उत्तरपूजा आणि विसर्जन करून घ्या.

गौरी विसर्जन करताना ‘या’ गोष्टी नक्की पाळा

गौरी विसर्जन हा फक्त एक विधी नाही तर गौरीला थँक्यू म्हणण्याचा आणि तिला निरोप देण्याचा दिवस आहे. त्यामुळे काही नियम पाळणं गरजेचं आहे.

1. सकाळी लवकर उठा – विसर्जनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करा. घर स्वच्छ ठेवा. गौरी जाणार म्हणून घरात रडगाणं करू नका, आनंदाने निरोप द्या.

2. उत्तरपूजा कशी करावी – उत्तरपूजेच्या वेळी गौरीला हळद, कुंकू, नारळ, सुपारी, अगरबत्ती लावा. तिने वर्षभर आपलं सौभाग्य टिकवावं म्हणून प्रार्थना करा. फराळाचे पदार्थ, पुरणपोळी, भात, वरण याचा नैवेद्य दाखवा.

3. वाण देणं महत्त्वाचं – गौरी विसर्जनाच्या वेळी 5 सुवासिनींना बोलावून वाण देण्याची पद्धत आहे. एका ताटात किंवा थाळीमध्ये वाणाचे साहित्य घ्या. ते आधी देवीसमोर दाखवा, त्याची पूजा करा आणि मग त्या महिलांना द्या. यामुळे घरात सुख समृद्धी राहते असं मानलं जातं.

4. दही भाताचा नैवेद्य – गौरीची शेवटची आरती झाल्यावर तिच्यावर अक्षता टाका. तिला दही भाताचा नैवेद्य दाखवा आणि विडा द्या. दही भात हा थंडावा देणारा असतो, त्यामुळे प्रवासासाठी दिला जातो असं म्हणतात.

5. दागिने काढायला विसरू नका – सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. अनेकांच्या गौरीचे मुखवटे हे पंचधातूचे किंवा सोन्या चांदीचे असतात. त्यावर तुम्ही दागिने घातले असतील तर विसर्जनाच्या आधी ते नक्की काढून घ्या. अनेकदा घाईत लोक दागिन्यांसकटच विसर्जन करतात आणि नंतर पश्चाताप करतात.

6. थोडी माती घरी आणा – गौरी विसर्जन केल्यावर तिथली थोडी माती घरी आणून चौरंगावर ठेवावी. ही माती खूप पवित्र मानली जाते. ती घरी ठेवल्याने गौरीचा आशीर्वाद कायम घरात राहतो अशी श्रद्धा आहे.

गौरी विसर्जन हे जड अंतःकरणाने केलं जातं पण पुढच्या वर्षी लवकर या असं सांगून तिला निरोप द्या. नियम पाळून, आनंदाने आणि श्रद्धेने विसर्जन करा, तुमची पूजा नक्कीच सफल होईल.

Web Title: Gauri visarjan 2026 7 important rules and rituals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 12:35 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganpati Festival

संबंधित बातम्या

Jahnavi Killekar On Trollers: ‘नवरा विकला का काय?’ म्हणणाऱ्या ट्रोलर्सना जान्हवी किल्लेकरचं सडेतोड उत्तर; VIDEO व्हायरल
1

Jahnavi Killekar On Trollers: ‘नवरा विकला का काय?’ म्हणणाऱ्या ट्रोलर्सना जान्हवी किल्लेकरचं सडेतोड उत्तर; VIDEO व्हायरल

‘घालीन लोटांगन’ नंतर ‘मंत्रपुष्पांजली’ का म्हणावी? मंत्रपुष्पांजलीचा अर्थ काय? काय आहे याचे महत्त्व?
2

‘घालीन लोटांगन’ नंतर ‘मंत्रपुष्पांजली’ का म्हणावी? मंत्रपुष्पांजलीचा अर्थ काय? काय आहे याचे महत्त्व?

आरतीनंतर म्हणाल्या जाणाऱ्या ‘घालीन लोटांगन’चा अर्थ काय? काय आहे याचे महत्त्व? आणि का म्हटले जाते आरतीच्या शेवटी?
3

आरतीनंतर म्हणाल्या जाणाऱ्या ‘घालीन लोटांगन’चा अर्थ काय? काय आहे याचे महत्त्व? आणि का म्हटले जाते आरतीच्या शेवटी?

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल
4

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.