यंदाच्या प्रजासत्ताक दिनी मराठीतून घ्या 'या' खास शुभेच्छा
देशभरात दरवर्षी २६ जानेवारीला मोठ्या आनंद आणि उत्साहात प्रजातसत्ताक दिन साजरा केला जातो. भारतीय लोकशाहीला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. या दिवशी स्वतंत्र भारतात लोकशाहीची स्थापना झाली होती. तसेच 26 जानेवारीला राजधानी दिल्लीमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. कर्तव्य पथावर परेड असतात. याशिवाय देशातील सर्वच शाळा, कॉलेजमध्ये ध्वजरोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. 1950 मध्ये 26 जानेवारी याचं दिवशी भारताने राज्यघटनेला स्वीकारले आणि भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक म्हणून उदयास आला.(फोटो सौजन्य – iStock)
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
भारताला राज्यघटना मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. प्रजासत्ताक दिन हा दिवस केवळ स्वातंत्र्य आणि लोकशाहीचा उत्सव नसून स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक आणि अनेक नेत्यांच्या सन्मानाचा दिवस आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी काही खास संदेश सांगणार आहोत. हे संदेश नातेवाईकांना पाठवून प्रजासत्ताक दिन आणखीन खास करा.
उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वासाठी ज्यांनी भारतदेश घडविला..! प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
देश विविध रंगाचा, देश विविध ढंगाचा देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा!
“गणराज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आपला देश समृद्ध, बलवान आणि एकतेचा प्रतीक राहो!”
“भारत देशाच्या संविधानाचा मान आणि गौरव वाढविणाऱ्या सर्वांना गणराज्य दिनाच्या शुभेच्छा!”
“बलसागर भारत व्हावे, विश्वात शोभूनी राहावे, भारतभूमीच्या तिरंग्याची शान कायम राहावी, हेच स्वप्न प्रत्येक भारतीयाने कायम पाहावे. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”
“विविधतेत एकतेचे प्रतीक म्हणजे भारत! जय हिंद, प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!”
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे,
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
स्वातंत्र्यासाठी फडकतो ध्वज
सूर्य तळपतो प्रगतीचा,
भारतभूच्या पराक्रमाला मुजरा मानाचा..
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना शुभेच्छा!
कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
प्रजासत्ताक दिनाच्या प्रेममय शुभेच्छा!
मोकळ्या आकाशात रंग भरू तीन
जगभर पसरवू रंग त्याग नी शौर्याचा
जगभर पसरवू रंग शांततेचा
जगभर पसरवू रंग समृद्धीचा,
करू नमन आपल्या तिरंग्याला,
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
गर्वाने बोलू भारतीय आहे मी,
देशातील टिकवूनी शांतता,
बदल घडवू, माणूसकी जपू,
आहोत एक आम्ही जरी देशात विविधता
प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
भारत देश विविध रंगांचा,
विविध ढगांचा आणि विविधता जपणार्या एकत्मतेचा…..
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा!