Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिझ्झा-बर्गर खाल्लात? पण ते पचवण्यासाठी चालले तर पाहिजेच! पण किती? जाणून घ्या

आवडते जंकफूड पूर्णपणे टाळण्याची गरज नाही, पण त्यानंतर कॅलरी जाळण्यासाठी व्यायाम व स्मार्ट स्नॅकिंग सवयी आवश्यक आहेत. आरोग्यासाठी प्रमाण, पोषण व वेळेची काळजी महत्त्वाची.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 13, 2025 | 04:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

पिझ्झा, बर्गर, समोसे, छोले-भटुरे यांची नावे ऐकताच जिभेला पाणी सुटते, पण या चविष्ट पदार्थांमुळे शरीरात नकळत प्रचंड कॅलरी जमा होतात आणि त्याचा दीर्घकालीन परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. अनेकदा आपण “थोडंच तर खाल्लंय” असा विचार करतो, परंतु हे ‘थोडं’ही आपल्या शरीराला जड पडू शकतं. याचा अर्थ असा नाही की आवडते पदार्थ कायमचे टाळावेत, मात्र त्यांचा आस्वाद घेतल्यानंतर त्या कॅलरी जाळण्यासाठी योग्य प्रमाणात शारीरिक हालचाल करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, २ समोसे (४३४ कॅलरी) खाल्ल्यानंतर अंदाजे १ तास ३७ मिनिटे चालावे लागते, १ प्लेट छोले-भटुरे (८८५ कॅलरी) साठी ३ तास १९ मिनिटे, २ पिझ्झा स्लाइस (६०० कॅलरी) साठी २ तास १५ मिनिटे आणि बर्गर (६५३ कॅलरी) साठी २ तास २७ मिनिटे चालावे लागते. लहान वाटणाऱ्या गोड पदार्थांमध्येही कॅलरी भरपूर असतात, २ गुलाबजाम (३०० कॅलरी) जाळण्यासाठी सुमारे १ तास ८ मिनिटे आणि आइसक्रीम बार (२४० कॅलरी) साठी ५४ मिनिटे चालावे लागते. यावरून स्पष्ट होते की चवदार स्नॅक्स खाल्ल्यानंतर त्यांना पचवण्यासाठी व्यायाम किंवा चालणे हे आवश्यकच आहे.

Baba Ramdev ने सांगितले सकाळी उपाशीपोटी तूप खाण्याचे 10 फायदे, खाण्याची योग्य पद्धत माहीत हवी

आरोग्य टिकवण्यासाठी ‘स्मार्ट स्नॅकिंग’ या सवयी अंगीकारणे महत्त्वाचे आहे. प्रथम, पॅकेटबंद स्नॅक्स घेताना फक्त कॅलरी नव्हे, तर घटकांची यादी वाचा. पहिल्या काही घटकांत साखर, रिफाइंड पीठ किंवा तेल असल्यास ते रोज न खाता कधीतरीच खावे. दुसरे, पोषणमूल्यांवर भर द्या, ताजे फळ, उकडलेले चणे, दही, भुईमूग, गाजर काकडीचे काप हे उत्तम पर्याय आहेत. तिसरे, खाण्याची मात्रा नियंत्रित ठेवा. थेट पॅकेटमधून न खाता छोट्या वाटीत घेऊन खा, त्यामुळे किती खातोय हे लक्षात राहते. चौथे, प्रोटीन किंवा फायबरयुक्त पदार्थांसोबत स्नॅक्स खा. अंडे, पनीर, दही, नट्स यामुळे जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते.

Parenting Tips: मुलं का बिघडत आहेत? ‘आई – वडिलांच्या चुका…’, काय बोलून गेले प्रेमानंद महाराज, पालकांनी वाचाच!

पाचवे, माइंडफुल ईटिंग करा. टीव्ही किंवा मोबाईल पाहत खाताना आपण नकळत जास्त खातो, त्यामुळे शांतपणे बसून खाण्याकडे लक्ष द्या. सहावे, वेळेची काळजी घ्या. रात्री उशिरा खाल्लेले स्नॅक्स चरबीच्या स्वरूपात साठण्याची शक्यता जास्त असते. आणि सातवे, खाण्यापूर्वी पाणी प्या. अनेकदा भूक नसून तहान लागलेली असते. थोडक्यात, पिझ्झा-बर्गर खाणं चुकीचं नाही, पण त्यानंतर पुरेसा व्यायाम, चालणे आणि स्मार्ट खाण्याच्या सवयी अंगीकारणं हीच खरी आरोग्याची गुरुकिल्ली आहे.

Web Title: Have you eaten pizza burger but its important to digest i

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2025 | 04:15 AM

Topics:  

  • Pizza Hut

संबंधित बातम्या

काय तो वेडेपणा! पाकिस्तानात नकली Pizza Hut च्या उद्घाटनाला रक्षा मंत्र्यांनी लावली हजेरी; खऱ्या कंपनीने पाठवली लीगल नोटीस
1

काय तो वेडेपणा! पाकिस्तानात नकली Pizza Hut च्या उद्घाटनाला रक्षा मंत्र्यांनी लावली हजेरी; खऱ्या कंपनीने पाठवली लीगल नोटीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.