प्रेमानंद महाराजांनी दिला पालकांना मोलाचा सल्ला (फोटो सौजन्य - Instagram/iStock)
प्रत्येक पालकाला असे वाटते की त्यांच्या मुलांमध्ये चांगले संस्कार असावेत आणि त्याला कोणत्याही वाईट सवयी लागू नयेत. चांगले संस्कार, योग्य शिस्त आणि सवयी यामुळे इतर लोकांकडे गेल्यानंतर मुलांचे कौतुक होते. पण नकळत पालक काही चुका करतात ज्यामुळे मूल ऐकत नाही, गैरवर्तन करते किंवा कधीच काहीही ऐकत नाही. अशा परिस्थितीत पालकांना मुलाला कसे सुधारायचे हे समजत नाही.
तथापि, वृंदावनचे संत प्रेमानंद महाराज यांनी पालकांच्या या समस्येवर आपले मत मांडले आहे. त्यांनी एका चुकीबद्दल सांगितले आहे ज्यामुळे मुले भरकटत आहेत आणि बिघडत आहेत. ती चूक काय आहे, ते सविस्तरपणे जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock/Instagram)
संत प्रेमानंद महाराज म्हणतात, ‘आज कुटुंबं भरकटत आहेत, त्यामागील कारण म्हणजे आपण त्यांना योग्य शिस्त लावत नाही. जर लहान वयातच मुलांना योग्य शिस्त लागली असेल तर मुले आणि त्यांचे वागणे खूप शिस्तबद्ध होईल.’ अनेकदा मुलांना लहान वयातच मोबाईल फोन दिले जातात आणि याचा अत्यंत वाईट दुष्परिणाम होताना दिसून येतो. महाराज स्पष्ट करतात की असे होते की मुलांना लहान वयातच मोबाईल फोन दिले गेल्यामुळे, त्यांना त्या वयात नको असलेले स्वातंत्र्य दिले जाते. पालक स्वतःच्या मजामस्तीत व्यस्त राहतात आणि मुले हळूहळू भरकटत जातात. मग जेव्हा ते मोठे होतात तेव्हा त्यांना सांभाळणे कठीण होते आणि त्यांना शिस्त लावणे अत्यंत कठीण होऊन बसते.
मुलांना संस्कारी आणि यशस्वी बनविण्यासाठी Nita Ambani च्या 5 पॅरेंटिंग टिप्स ठरतील 100 टक्के योग्य
प्रेमानंद महाराज यांनी पुढे सांगितले की ‘आजकाल अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, जर मूल चुकीच्या मार्गावर जात असेल आणि पालक मुलाला शिस्त लावण्यासाठी ओरडण्याचा आणि त्यांच्या वृत्ती नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात, तर यावर अनेक पालकांनी सांगितले आहे की मुले धमक्या देऊ लागतात आणि महत्त्वाचे म्हणजे धमकीनंतर पालक घाबरतात.
प्रेमानंद स्पष्ट करतात की, ‘मुलाच्या धमकीनंतर पालक घाबरतात हे अत्यंत चुकीचे आहे आणि नंतर पालकांना वाटते की मुलांनी असे वागले पाहिजे अथवा वेगळ्या पद्धीतने वागले पाहिजे. तुम्ही असे का कराल? म्हणूनच प्रेमानंद महाराजांनी सल्ला दिला की, जर रागावल्याचे नाटक करणे आवश्यक असेल तर ते करा. पण मुलांना चुकीच्या मार्गावर जाण्यासाठी तुम्ही प्रवृत्त करू नका’
शेवटी, महाराज पालकांना समजावून सांगतात की त्यांनी रागावू नये. त्यांचे काम जसे आहे तसे करा. पण रागावू नका. मुलांवर राग काढणे खूप हानिकारक आहे. म्हणून असे करू नका. मुलांना समजावून सांगितले तर लगेच कळते. पण रागात सांगितल्याने मुलं अधिक बिथरू शकतात आणि मग ती अधिक बिघडतात. त्यामुळे पालकांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवत मुलांना चुकत असल्यास योग्य पद्धतीने विचारपूर्वक गोष्टी समजवाव्यात असाही सल्ला यावेळी महाराजांनी दिला आहे.
Parenting Tips: 3 गोष्टीसाठी मुलांना कधीच ओरडू नये, लर्निंग स्किलवर होतो परिणाम; पालकांनी व्हा सावध
१. मुलं बिघडण्यामागे पालक असू शकतात का?
हो बऱ्याच अंशी मुलं बिघडण्यामागे पालक हेच कारण असतात. कारण निरर्थक लाड केल्याने हे घडू शकते.
२. मुलांना शिस्त लावण्यासाठी ओरडणे योग्य आहे का?
मुलांना शिस्त लावण्यासाठी ओरडणे योग्य आहे मात्र त्यांच्या अंगावर हात उचलणे नक्कीच चूक आहे