
अक्कलदाढ सहसा 17 ते 25 वर्षांच्या दरम्यान येते. काहींमध्ये ती 30 वर्षांनंतरही येऊ शकते तर काही लोकांच्या आयुष्यात कधीच येत नाही – हे दोन्ही प्रकार पूर्णपणे सामान्य आहेत. अक्कलदाढ येताना काही दिवस हलका-फुलका त्रास जाणवू शकतो. जसं की, हिरड्यांना सूज येणे, जबडा उघडताना त्रास होणं असं त्रास होतात. मात्र जर हिरड्यांच्या जवळ पुरेशी जागा असेल किंवा तर कोणताही त्रास होत नाही. मात्र दाढ यायला पुरेशी जागा नसेल तर हीच अक्कलदाढ खूप त्रास देखील देते. जसं की, खाण्यात त्रास,तोंडाच्या मागे दाब जाणवणं आणि डोकेदुखी किंवा कानाजवळ दुखणं असा त्रास होतो. अक्कलदाढ जर व्य़वस्थित आली नाही तर, हिरड्याखाली अडकून इन्फेक्शन, पॉकेट्स तयार होणे, वास येणे, किंवा शेजारच्या दाढेला नुकसान करु शकते.
प्रत्येकाची शरीरयष्टी आणि रोगप्रतिकारशक्ती वेगवेगळी असते. अलिकडच्या काळात पुर्वीसारखा सकस आहारा राहिला नाही. धावपळीच्या जगात फास्टफूडवर जास्त भर दिला जातो त्यामुळे दातांना पाहिजे तसं पोषण मिळत नाही. म्हणूनच कमकुवत रोगप्रतिकारकशक्ती असल्यामुळे अक्कलदाढ येताना खुप त्रास होतो. ही दाढ जर वाकडी तिकडी येत असेल तर हिरड्या सुजणं थंड किंवा गरम काही खाताना दुखणं थोडक्यात काय दात अतिशय संवेदनशील होतात. त्यामुळे अक्कलदाढ येताना जर तुम्हालाही दुखत असेल तर हे दुखणं अंगावर काढू नका, वेळीच डेन्टिस्टचा सल्ला घ्या असं कायमच आरोग्यतज्ज्ञाकडून सांगितलं जातं.
Ans: अक्कलदाढ ही तोंडाच्या मागच्या भागातील तिसरी व शेवटची दाढ असते. एकूण चार अक्कलदाढा येऊ शकतात – वरच्या दोन्ही बाजूंना आणि खालच्या दोन्ही बाजूंना.
Ans: ही दाढ बहुतेक लोकांमध्ये १७ ते २५ वर्षांच्या दरम्यान येते. काहींमध्ये उशिरा, म्हणजे ३० वर्षांनंतर येऊ शकते, तर काहींमध्ये ती कधीच येत नाही.
Ans: जेव्हा दाढ उगवायला जागा कमी असते किंवा ती आडवी/वाकडी वाढते, तेव्हा हिरड्यांवर दाब येतो, सूज होते आणि त्यामुळे वेदना जाणवतात.