अन्नपदार्थांचे कण अडकून दातांमध्ये ठणके मारतात? दातांचे आरोग्य सुधरण्यासाठी करून पहा 'हे' घरगुती उपाय
दात स्वच्छ करण्यासाठी घरगुती उपाय?
दातांना कीड लागण्याची कारणे?
दातांवरील पिवळा थर कमी करण्यासाठी उपाय?
सौंदर्य खुलून दिसण्यासाठी ज्याप्रमाणे त्वचा, चेहरा आणि केसांची काळजी घेतली जाते, तशीच काळजी दातांची सुद्धा घेणे आवश्यक आहे. बऱ्याचदा कामाच्या धावपळीमध्ये दातांच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष दिले जात नाही. यामुळे दात किडणे, दातांमध्ये अन्नपदार्थांचे कण साचून राहणे, दातांवर जमा झालेला पिवळा आणि पांढरा थर इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी दात आणि हिरड्या कायमच मजबूत असणे आवश्यक आहे. दातांमध्ये पडलेल्या लहान छिद्रांमध्ये अन्नपदार्थांचे कण तसेच साचून राहतात. हे कण कुजल्यानंतर हिरड्यांमध्ये होल पडणे किंवा दातांचा कीड लागण्याची शक्यता असते. दातांच्या छिद्रांमध्ये अडकून राहिलेले अन्नपदार्थांचे कण लवकर बाहेर पडून जात नाहीत. (फोटो सौजन्य – istock)
सकाळी उठल्यावर सुस्ती का येते? शरीरात हा त्रास असू शकतो
दातांना लागलेल्या किडीमुळे दातांमध्ये वेदना होणे, रक्त येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. पण तरीसुद्धा दातांच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष दिले जात नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दातांमध्ये अडकलेले अन्नपदार्थांचे कण बाहेर काढून टाकण्यासाठी आणि दात स्वच्छ ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय दातांमधील कीड नष्ट करून टाकते. दात व हिरड्यांना दीर्घायुष्य देण्यासाठी स्वयंपाक घरातील पदार्थांचा वापर करावा. दातांचे आरोग्य चांगले असल्यास आत्मविश्वास वाढतो.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पेरू खायला खूप जास्त आवडतो. पेरूसोबत पेरूची पाने सुद्धा अतिशय प्रभावी ठरतात. पेरूच्या पानांमध्ये शक्तिशाली अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे दातांच्या समस्यांपासून सुटका मिळते. पेरूच्या पानांचा नैसर्गिक माउथवॉश बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करून त्यात पेरूची पाने घालून उकळवून घ्या. तयार केलेला माउथवॉश थंड झाल्यानंतर गुळण्या करून घ्या. गुळण्या केल्यामुळे दातांच्या बारीक छिद्रांमध्ये अडकून पडलेली घाण बाहेर पडून जाईल आणि हिरड्या स्वच्छ होतील. याशिवाय पेरूची पाने चावून थुकून दिसल्यानंतर पाण्याच्या गुळण्या कराव्यात.
दैनंदिन आहारात फायबर असलेल्या भाज्यांचे आणि फळांचे सेवन करावे. सफरचंद, गाजर किंवा काकडी इत्यादी तंतुमय पदार्थांचे सेवन करावे. दातांवर जमा झालेला प्लेक नावाचा पातळ थर नैसर्गिकरित्या काढून टाकण्यासाठी नाश्त्यात किंवा जेवणानंतर फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. सकाळच्या नाश्त्यात सफरचंदचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात. दातांमध्ये वाढलेली कीड आणि पिवळा थर कमी करण्यासाठी फायबर असलेल्या पदार्थांच्या सेवनामुळे दात स्वच्छ होतात.
सावधान! बालकांमध्ये वाढतंय हृदयविकाराचे प्रमाण, हृदयदोषासह बदलत्या जीवनशैलीचा आरोग्यावर गंभीर परिणाम
जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी लवंगचा वापर केला जातो. लवंग किंवा लवंग तेलाचा वापर तुम्ही करू शकता. दातांमध्ये लागलेली कीड, जळजळ आणि वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी लवंग तेलाचा वापर करावा. कापसाच्या गोळ्यावर लवंग तेल घेऊन किडलेल्या दातांवर ठेवावा. दातांमधील अडकलेले अन्नकण साफ करण्यासाठी लवंग तेलाचा वापर करावा.
Ans: दात पिवळे होण्याची अनेक कारणे असू शकतात.
Ans: बेकिंग सोड्यामध्ये थोडे पाणी मिसळून पेस्ट बनवा आणि हलक्या हाताने ब्रश करा.
Ans: नियमितपणे दिवसातून दोनदा ब्रश करा आणि फ्लॉस करा.






