Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उष्णतेच्या परिणामाने सडू शकते किडनी, या लक्षणांपूर्वी करा 4 उपाय

Kidney Failure Causes: उन्हाळ्यात किडनी खराब होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. अशा परिस्थितीत किडनी निरोगी ठेवण्यासाठी हे 4 महत्त्वाचे उपाय वेळेवर करणे गरजेचे आहे. यासाठी काही लक्षणे दिसू लागताच करा त्वरीत उपाय.

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 30, 2024 | 04:29 PM
Kidney Failure

Kidney Failure

Follow Us
Follow Us:

उन्हाळ्यात किडनी निरोगी ठेवणे हे मोठे आव्हान असते. विशेषत: त्या लोकांसाठी जे उच्च तापमान असलेल्या ठिकाणी राहतात. नॅशनल किडनी फाऊंडेशनच्या मते, 40 डिग्री सेल्सिअस तापमान आणि 70 टक्के आर्द्रतेमध्ये राहिल्याने किडनीला धोका निर्माण होतो. कारण प्रत्येकाच्या शरीराला आवश्यकतेनुसार घाम येतोच असे नाही. 

या लेखातून आम्ही तुम्हाला याबाबत अधिक माहिती देत आहोत की, किडनी शरीरातील टाकाऊ पदार्थ फिल्टर करण्याचे काम करते. अशा परिस्थितीत शरीरात पाण्याची कमतरता असल्यास किडनीवर जास्त दबाव येतो. अशा परिस्थितीत, मूत्रपिंड निकामी होणे किंवा नुकसान टाळण्यासाठी लक्षणे दिसण्यापूर्वीच उपाययोजना करणे शहाणपणाचे आहे. या लेखात तुम्हाला किडनी निरोगी ठेवण्याच्या सोप्या मार्गांबद्दल तपशीलवार माहिती मिळेल. (फोटो सौजन्य – iStock) 

किडनी खराब होण्याची सुरूवातीची लक्षणे 

  • वारंवार लघ्वी होणे
  • त्वचेला सतत खाज येणे
  • पाठदुखी
  • छाती दुखणे
  • अशक्त आणि थकल्यासारखे वाटणे
  • हात आणि पायाला सूज
  • UTI
  • भूक न लागणे
  • उच्च रक्तदाब
  • धाप लागणे

किडनी हेल्दी ठेवण्याचे सोपे उपाय 

स्वत:ला हायड्रेटेड ठेवा

मुत्रपिंडाच्या आरोग्यासाठी पुरेसे पाणी पिणे सर्वात गरजेचे आणि महत्त्वाचे आहे. खरं तर, उन्हाळ्यात जास्त घाम येतो, त्यामुळे शरीरातील पाणी कमी होते. अशा स्थितीत शरीरात घाण आणि ॲसिड जमा होण्यास सुरुवात होते जी किडनी ब्लॉक करण्याचे काम करते. म्हणून, दर दोन तासांनी एक ग्लास पाणी पिण्याव्यतिरिक्त, आपल्या आहारात अधिक पाणीयुक्त भाज्या आणि फळांचा समावेश करा.

[read_also content=”वाढत्या उष्णतेमुळे मुतखड्यांच्या प्रकरणात वाढ https://www.navarashtra.com/lifestyle/kidney-stone-cases-increasing-due-to-rising-temperature-experts-worried-about-the-same-538034/”]

मीठ-साखरेचे सेवन कमी 

जास्त प्रमाणात मीठ आणि साखर खाल्ल्याने किडनी खराब होते. त्यामुळे जेवणात मीठ आणि साखरेचे प्रमाण कमी करा. पॅकेज्ड फूड आणि प्रोसेस्ड फूड टाळा, कारण त्यामध्ये या दोन्ही गोष्टींचे प्रमाण जास्त असते. घरगुती जेवणात मीठ आणि साखरेचा कमीत कमी वापर करा.

वजन नियंत्रित ठेवा 

किडनीच्या आजारासाठी लठ्ठपणा हा एक प्रमुख जोखीम घटक आहे. म्हणून, किडनीच्या आरोग्यासाठी निरोगी वजन राखणे खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत पौष्टिक आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा. तुमचे वजन वाढले असेल तर वेळीच ते कमी करण्याचा प्रयत्न करा. 

[read_also content=”शरीरात बसवली डुकराची किडनी, तरूणाचा झाला मृत्यू https://www.navarashtra.com/world/a-patient-who-had-a-pig-kidney-implanted-in-his-body-died-the-surgery-was-done-two-months-agonrsk-532724/”]

धूम्रपान आणि मद्यपान टाळा

धूम्रपान आणि अल्कोहोलचे सेवन मूत्रपिंडांना अर्थात किडनीला हानी पोहोचवू शकते. म्हणून, जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर ते सोडण्याचा प्रयत्न करा आणि अल्कोहोलचे सेवन कमी करा. अधिकाधिक स्वतःला जपण्याचा प्रयत्न करा. 

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Heat weather can be caused for kidney failure 4 things to avoid kidney failure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2024 | 04:29 PM

Topics:  

  • Kidney Health Tips

संबंधित बातम्या

Kidney Detox Food: किडनीमधील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी खा ‘हे’ हेल्दी पदार्थ, शरीर होईल स्वच्छ
1

Kidney Detox Food: किडनीमधील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी खा ‘हे’ हेल्दी पदार्थ, शरीर होईल स्वच्छ

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी
2

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.