कोलेस्ट्रॉलची कोणती लक्षणे दिसतात (फोटो सौजन्य - iStock)
कोलेस्टेरॉल ही एक मेणासारखी पिवळी चरबी आहे जी रक्तवाहिन्यांमध्ये जमा होते. कोलेस्टेरॉल यकृतामध्ये तयार होते. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल असते ते म्हणजे चांगले आणि वाईट. जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये वाईट कोलेस्टेरॉल वाढते तेव्हा हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. जेव्हा शरीरात कोलेस्टेरॉल वाढते तेव्हा शरीरात काही लक्षणे दिसून येतात. सकाळी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. सकाळी कोलेस्ट्रॉलची लक्षणे कोणती आहेत ते जाणून घेऊया. आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी कोलेस्ट्रॉलच्या लक्षणांबाबत अधिक माहिती दिली आहे.
पाय दुखणे
उठल्यावर सकाळी पाय दुखतात
सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला पाय दुखत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. हे दुखणे उच्च कोलेस्ट्रॉलचे लक्षण असू शकते. जर तुम्हाला विनाकारण पाय दुखत असतील तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नये, उलट तुम्ही डॉक्टरकडे जावे आणि वेळीच यावर उपाय करून घ्यावा
कॉफी पिण्याने कोलेस्ट्रॉल वाढतं? Heart Attack पासून दूर राहण्यासाठी अभ्यासातील खुलासा एकदा वाचाच!
हात आणि पाय पिवळे पडणे
शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी वाढली की हात आणि पाय पिवळे दिसतात. कोलेस्टेरॉलमुळे हात आणि पाय सुन्न होतात आणि मुंग्या येतात. सकाळी उठल्यानंतर जर तुमच्या त्वचेच्या रंगात बदल होत असेल तर तुम्ही डॉक्टरकडे जाणे अत्यंत गरजेचे आहे. कोलेस्ट्रॉलमध्ये वाढ झाली असेल तर सर्वात मोठे आणि पहिले लक्षण हात पाय पिवळे पडणे हे दिसून येते. याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये
घाम येणे
जास्त घाम आल्यानंतर वेळीच डॉक्टरांकडे जा
जर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर खूप घाम येत असेल तर चुकूनही या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. जास्त घाम येणे हे उच्च कोलेस्ट्रॉलचे लक्षण असू शकते. कारण जेव्हा शरीरात कोलेस्टेरॉल वाढते तेव्हा शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रकारे होत नाही. हेच कारण आहे की आपल्याला घाम येतो. सतत घाम येत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये आणि आपल्या डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यावा
छातीत दुखणे
सकाळी उठल्यानंतर छातीत कळा येत असल्यास
जर तुम्हाला सकाळी उठताच छातीत दुखत असेल किंवा जडपणा जाणवत असेल तर तुम्ही या लक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. छातीत जडपणा आणि वेदना ही कोलेस्टेरॉलची लक्षणे आहेत. घाणेरड्या कोलेस्ट्रॉलमुळे छातीत अधिक दुखू शकते आणि कोणत्या क्षणी हार्ट अटॅक येईल हे तुम्हालाही कळणार नाही. त्यामुळे या लक्षणाकडे दुर्लक्ष करणे तुमच्या जीवावरही बेतू शकते
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.