Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्लॅकहेड्समुळे त्वचा खराब झाली असेल तर क्षणार्धात सुटका मिळवण्यासाठी घरी करून पहा ‘हे’ सोपे उपाय

प्रदूषण, धूळ, माती इत्यादी अनेक कारणामुळे नाकावर ब्लॅकहेड्स येतात. ब्लॅकहेड्स आल्यानंतर चेहरा पूर्णपणे खराब होऊन जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहोत. हे नक्की करून पहा.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 26, 2024 | 02:30 PM
ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी घरगुती उपाय

ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी घरगुती उपाय

Follow Us
Close
Follow Us:

वातावरणात सतत होणारे बदल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी इत्यादी गोष्टींचा परिणाम जसा आरोग्यावर दिसून येतो, तसाच परिणाम त्वचेवर सुद्धा दिसून येतो. चेहऱ्यावर पिंपल्स येणे,ब्लॅकहेड्स, मुरूम, पुरळ येणे या सामान्य समस्या आहेत. पण यातील प्रामुख्याने जाणवणारी समस्या म्हणजे त्वचेवर आणि नाकावर ब्लॅकहेड्स येणे. नाकावर ब्लॅकहेड्स आल्यानंतर काळे काळे डाग दिसू लागतात. हे काळे मेकअप केल्यानंतर सुद्धा लपले जात नाही. ब्लॅकहेड्स आल्यानंतर त्वचेचे सौंदर्या खराब होऊन जाते.ब्लॅकहेड्स प्रामुख्याने नाकावर, कपाळाला आणि हनुवटीवर येतात. ब्लॅकहेड्स येणेमागे अनेक कारण आहेत. त्वचेच्या ओपन पोर्समध्ये जमा झालेली घाण, तेल, प्रदूषण इत्यादींमुळे चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स येतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा:दिवाळीमध्ये सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी घरीच तयार करा टोनर, त्वचेवर येईल नैसर्गिक ग्लो

ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी घरगुती उपाय:

बेकिंग सोडा:

चेहऱ्यावर आलेले ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर करू शकता., बेकिंग सोड्यामध्ये असलेले गुणधर्म त्वचेवरील डाग घालवण्यासाठी सुद्धा मदत करतात. तसेच त्वचा एक्सफोलिएट होते. त्वचेवर जमा झालेल्या मृत पेशी काढण्याचे आणि अतिरिक्त तेल कमी करण्याचे काम बेकिंग सोडा करतो. वाटीमध्ये १ चमचा बेकिंग सोडा घेऊन त्यात पाणी टाकून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट नाकावर लावून हलक्या हाताने मसाज करून पाण्याने त्वचा स्वच्छ धुवा.

वाफ घेणे:

आठवड्यातून एकदा वाफ घेतल्यामुळे त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते. तसेच त्वचेवरील छिद्र उघडून त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जाण्यास मदत होते. भांड्यात पाणी गरम करून वाफ घ्या. 10 ते 15 मिनिटं नॉर्मल गरम पाण्याची वाफ घेऊन त्वचा पुसून घ्या. यामुळे नाकावर आलेले ब्लॅकहेड्स कमी होण्यास मदत होईल. हा नैसर्गिक उपाय केल्यास त्वचा खराब होणार नाही.

केळीच्या सालीचा वापर करणे:

त्वचेवरील ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी तुम्ही केळीच्या सालीचा वापर करू शकता. यासाठी केळीची साल नाकावर चोळा आणि ५ मिनिटांनी त्वचा स्वच्छ पाण्याने धुवा. केळीची साल त्वचा नैसर्गिकरित्या स्क्रब करण्याचे काम करते. या सालीचा वापर केल्यामुळे त्वचा उजळू लागते. केळीची साल नाकावरील
ब्लॅकहेड्सला लावल्यामुळे त्वचा स्वच्छ होण्यास मदत होईल.

हे देखील वाचा:या आजारामुळे गालावर आणि नाकावर येतात काळे डाग! दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय येतील कामी

हळद:

मागील अनेक वर्षांपासून आयुर्वेदात हळदीचा वापर त्वचेच्या निरोगी आरोग्यासाठी केला जात आहे. हळदीपासून वेगवेगळ्या प्रकारचे ब्युटी प्रॉडक्टसुद्धा बनवले जातात. हळदीचा वापर करून नाकावर आलेले ब्लॅकहेड्स कमी करू शकता. यासाठी हळदीची पेस्ट तयार करून नाकावर लावा. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-सेप्टिक आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे त्वचेचे बॅक्टरीयापासून नुकसान होत नाही.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Home remedies to get rid of blackheads why do blackheads appear on the nose

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2024 | 02:30 PM

Topics:  

  • Beauty Tips

संबंधित बातम्या

केसांमध्ये गजरा माळण्याचे ‘हे’ सुंदर आणि आकर्षक प्रकार, कोणत्याही साडीवर दिसतील उठावदार
1

केसांमध्ये गजरा माळण्याचे ‘हे’ सुंदर आणि आकर्षक प्रकार, कोणत्याही साडीवर दिसतील उठावदार

नव्या नवरीसाठी दागिन्यांची खरेदी करायची आहे? युनिक डिझाईन्स खास तुमच्यासाठी, पहा क्लासिक कलेक्शन
2

नव्या नवरीसाठी दागिन्यांची खरेदी करायची आहे? युनिक डिझाईन्स खास तुमच्यासाठी, पहा क्लासिक कलेक्शन

लग्नात करवलीसाठी साऊथ इंडियन घागऱ्याच्या सुंदर डिझाइन्स! मनमोहक लुकचे सगळेच करतील कौतुक
3

लग्नात करवलीसाठी साऊथ इंडियन घागऱ्याच्या सुंदर डिझाइन्स! मनमोहक लुकचे सगळेच करतील कौतुक

फॅशन युगात हातमागावरील ‘या’ साड्या कधीच होणार नाहीत जुन्या, पहा रॉयल लुक दिसणाऱ्या सुंदर साड्या
4

फॅशन युगात हातमागावरील ‘या’ साड्या कधीच होणार नाहीत जुन्या, पहा रॉयल लुक दिसणाऱ्या सुंदर साड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.