मान आणि कोपरांवरील काळेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय
सर्वच महिला सुंदर दिसण्यासाठी सतत काहींना काही करत असतात. कधी फेसमास्क लावणे तर कधी त्वचा सुंदर दिसण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले वेगवेगळे फेशिअल करून घेतात. त्वचेची भरपूर काळजी घेतली जाते पण मान आणि कोपऱ्यांवरील काळेपणाकडे महिला जास्त लक्ष देत नाही.मान आणि कोपरांवरील काळेपणा वाढल्यानंतर सौंदर्य खराब होऊ लागते. मान काळी झाल्यानंतर ती उजळ्वण्यासाठी महिला वेगवेगळ्या फेअरनेस क्रीम्स किंवा इतरही वेगवेगळ्या क्रीम्स लावतात. मात्र तरीसुद्धा मानेवरील काळेपणा जात नाही. शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांचा परिणाम त्वचेवर लगेच दिसून येतो. त्यामुळे त्वचेच्या आरोग्याची आणि शरीराची योग्य ती काळजी घ्यावी. शरीराच्या इतर अवयवांवर साचून राहिलेली घाण स्वच्छ केली नाहीतर हळूहळू काळेपणा वाढू लागतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मान आणि कोपरांवरील काळेपणा कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे मानेवरील काळेपणा कमी होईल.(फोटो सौजन्य-istock)
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
मागील अनेक वर्षांपासून त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कोरफड जेलचा वापर केला जात आहे. कोरफड जेल त्वचेवरील काळे डाग, पिंपल्सचे डाग घालवण्यासाठी मदत करतो. कोरफड जेल मान, कोपर इत्यादी शरीराच्या अवयवांवर लावल्यामुळे त्वचेसंबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल. सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी कोरफड जेलचा वापर करावा. काळेपणा घालवण्यासाठी कोमट पाण्यात एक चमचा कोरफड जेल मिक्स करून कापसाच्या सहाय्याने मान आणि कोपरांवरील काळ्या पडलेल्या भागावर लावून घ्या. १५ ते २० मिनिटं ठेवून पाण्याने त्वचा स्वच्छ करा. यामुळे काळेपणा हळूहळू कमी होण्यास मदत होईल.
विटामिन सी युक्त लिंबू त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. त्वचेवर लिंबू लावल्यामुळे काळेपणा कमी होईल आणि त्वचा सुंदर दिसेल. लिंबामध्ये आढळून येणारे सायट्रिक ऍसिड त्वचा उजळदार करण्यासाठी मदत करते. यासाठी वाटीमध्ये लिंबाचा रस घेऊन त्यात मध मिक्स करा. मध मिक्स करून झाल्यानंतर तयार केलेले मिश्रण मान आणि कोपरांवर लावून ३० मिनिटं तसेच ठेवून द्या. त्यानंतर मान आणि कोपर स्वच्छ धुवा.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर केला जातो. शिवाय त्वचेसंबंधित समस्यांसाठी सुद्धा बेकिंग सोड्याचा वापर केला जातो. हे एक नैसर्गिक एक्सफोलिएंटर आहे, ज्यामुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जातात आणि त्वचा स्वच्छ होते. वाटीमध्ये बेकिंग सोडा घेऊन पेस्ट तयार करा. तयार पेस्ट मान आणि कोपरावर लावून काहीवेळ ठेवून नंतर पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे डाग कमी होण्यास मदत होईल.