'या' पद्धतीने त्वचेवर करा तुरटीचा वापर:
धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकदा महिलांना त्वचेकडे व्यवस्थित लक्ष देता येत नाही. सतत काम करत राहिल्यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. बाहेरील वातावरणाचा मोठा परिणाम त्वचेवर दिसून येतो. शिवाय थंडीच्या दिवसांमध्ये चेहऱ्याची त्वचा जास्तच कोरडी होऊन जाते. त्वचा कोरडी झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. अशावेळी अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल ट्रीटमेंट किंवा फेशिअल इत्यादी अनेक गोष्टी करतात. वातवरणात सतत होणारे बदल, धूळ, माती, प्रदूषण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम त्वचेवर लगेच दिसून येतो. यामुळे चेहऱ्यावर केलेला मेकअप जास्त वेळ टिकून राहत नाही. त्वचेसंबंधित समस्या सोडवण्यासाठी मधील ब्यूटी पार्लरमध्ये जातात. पण त्वचेवर केमिकल प्रॉडक्टचा अतिवापर केल्यामुळे त्वचेमधील नैसर्गिक तेल निघून जाते.(फोटो सौजन्य-istock)
स्किन केअर संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी केमिकल उपाय करण्यावाऐवजी घरगुती उपाय करून पाहावे. यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारते आणि त्वचेला अनेक फायदे होतात. हिवाळ्यात कोरडी पडलेली त्वचा सुधारण्यासाठी तुम्ही तुरटीचा वापर करू शकता. तुरटीमध्ये आढळून येणारे गुणधर्म त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत. यामध्ये टीसेप्टिक, प्रतिजैविक, अँटी-ट्रायकोमोनास इत्यादी प्रभावी घटक आढळून येतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्वचेच्या निरोगी आरोग्यसाठी तुरटीचा वापर कसा करावा? तुरटी त्वचेला लावल्यामुळे काय फायदे होतात? याबद्दल सांगणार आहोत.
मागील अनेक वर्षांपासून तुरटीचा वापर त्वचेसंबंधित समस्या सोडवण्यासाठी केला जात आहे. त्वचेवर तुरटी लावल्यामुळे त्वचा उजळदार आणि गोरीपान दिसते. शिवाय पिंपल्समुळे आलेले डाग निघून जाण्यास मदत होते. यासाठी वाटीमध्ये तुरटी घेऊन तिची बारीक पावडर तयार करून घ्या. त्यामध्ये आवश्यकतेनुसार गुलाब पाणी मिक्स करून पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट मान आणि चेहऱ्यावर लावून काहीवेळ व्यवस्थित मसाज करा. यामुळे त्वचेमधील रक्तभिसरण सुधारेल. १५ मिनिटं मसाज करून झाल्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ करा.
स्किन केअर संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा