चेहऱ्यावरील लालसरपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय
वातावरणातील बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. पावसाळ्यात हवेमध्ये आद्र्रता असते. या अद्र्तेचा परिणाम आरोग्यासह त्वचेवर सुद्धा होतो. वातावरणातील आद्र्रतेमुळे चेहरा तेलकट आणि चिकट होऊन जातो. चेहरा तेलकट किंवा चिकट झाल्यानंतर चेहऱ्यावर हळूहळू फोड आणि पिंपल्स येण्यास सुरुवात होते. चेहऱ्यावर आलेले फोड किंवा पिंपल्स हाताने कोचून फोडल्यानंतर तिथे डाग पडण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात बाहेर जाऊन आल्यानंतर चेहऱ्यावर लाल डाग येणे, खाज येणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. या समस्यांपासूनआराम मिळवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत, जे केल्यामुळे तुमच्या त्वचेला फायदे होतील.(फोटो सौजन्य-istock)
चेहऱ्यावरील लालसरपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय
खराब झालेली त्वचा सुधारण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर केला जातो. गुलाब पाण्यामध्ये कूलिंग इफेक्ट असतात,ज्यामुळे चेहरा थंड राहतो. खाज किंवा मुरुमांनी लाल झालेला चेहरा पुन्हा एकदा उजळ्वण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर करावा. गुलाब पाणी तुम्ही काकडीमध्ये मिक्स करून सुद्धा वापरू शकता. हे त्वचेला 10 ते 15 मिनिटं लावून ठेवा. यामुळे तुमच्या त्वचेवरील लालसरपणा कमी होईन त्वचा सुधारण्यास मदत होईल.
हे देखील वाचा: चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी ‘अशा’ पद्धतीने बनवा फेसपॅक, चेहरा दिसेल तरुण
चेहऱ्यावरील लालसरपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय
मागील अनेक वर्षांपासून मधाचा वापर त्वचेच्या सुंदर आरोग्यासाठी केला जात आहे. मधामध्ये असलेले गुणधर्म त्वचेचा पोत सुधारण्यासाठी मदत करतात. मधामध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्म त्वचेला आलेली सूज आणि लालसरपणा कमी करण्यासाठी मदत करते. चेहऱ्यावर आलेले रॅश किंवा खाज दूर करण्यासाठी लाल झालेल्या चेहऱ्यावर मध लावून 10 ते 15 मिनिटं तसंच ठेवून घ्या. चेहरा कोरडा झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील लालसरपणा आणि रॅश निघून जातील.
चेहऱ्यावरील लालसरपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय
कोरफड जेलमध्ये असलेले गुणधर्म त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहेत. यामुळे चेहऱ्यावरील लाल डाग आणि रॅश निघून जातात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चेहऱ्यावर फोड किंवा मुरूम येतात. हे मुरूम घालवण्यासाठी कोरफड जेल चेहऱ्याला लावून 15 ते 20 मिनिटं ठेवून घ्या. त्यानंतर चेहरा कोरडा झाल्यावर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा.
हे देखील वाचा: तुम्हालाही सतत चेहरा धुण्याची सवय आहे? गंभीर परिणाम होऊ शकतात, आजच जाणून घ्या
चेहऱ्यावरील लालसरपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय
चेहऱ्यावर नियमित बर्फाने मसाज केल्यामुळे चेहरा सुंदर आणि चमकदार होतो. पिंपल्स लिवा मुरूम येऊन खराब झालेली त्वचा सुधारण्यासाठी नियमित चेहऱ्यावर बर्फाने मसाज करा. यासाठी कॉटनच्या कपड्यामध्ये बर्फाचा तुकडा घेऊन संपूर्ण चेहऱ्यावर मसाज करा. त्यानंतर तुम्हाला हवे असल्यास चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे हरवलेला त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होईल.