अळशीच्या बिया आणि तांदळाचे पीठ वापरण्याचे फायदे
वय वाढल्यानंतर हळूहळू त्वचेमध्ये सुद्धा बदल होण्यास सुरुवात होते. त्वचेमध्ये झालेल्या बदलांमुळे चेहऱ्यावरील तेज कमी होऊन सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसू लागतात. चेहऱ्यावर वय वाढल्यानंतर दिसणाऱ्या खुणा बदलत्या वातावरण आणि जीवनशैलीमुळे कमी वयातच दिसू लागल्या आहेत. या खुणा दिसू लागल्यानंतर चेहरा निस्तेज आणि म्हातारा होऊन जातो. चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, त्वचा लूज पडणे, स्किन रिंकल्स येणे अशा अनेक समस्या उद्भवू लागल्यानंतर चेहऱ्यावरील तारुण्य निघून जाते.
कमी वयात चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या घालवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. केमिकल ट्रीटमेंट, फेशिअल, ब्यूटी ट्रिटमेंट्स, बाजारात मिळणाऱ्या क्रीम्स इत्यादी अनेक गोष्टी लावल्या जातात. पण त्याचा फारसा परिणाम चेहऱ्यावर दिसून येत नाही. कमी वयातजाणवू लागलेली लक्षणे पुढे जाणून मोठी होण्याची शक्यता असते. शरीराला बाहेरून क्रीम्स किंवा इतर गोष्टी लावण्यापेक्षा शरीराला आतून पोषण मिळाले तर चेहरा आणखीन सुंदर दिसतो. चेवर बारीक खुणा, सुरकुत्या, वृद्धत्वाची लक्षणे दूर करण्यासाठी योग्यते स्किन केअर फॉलो करून खाण्यापिण्याच्या सवयी सुद्धा व्यवस्थित फॉलो केल्या पाहिजेत.त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तांदळाच्या पीठाचा वापर करून फेसपॅक कसा तयार करायचा याची सोपी कृती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: Independence Day 2024: यंदाच्या स्वातंत्र्यदिनी उठावदार आणि सुंदर दिसण्यासाठी ‘या’ गोष्टींची घ्या मदत
तांदळाच्या पीठापासून फेसपॅक बनवण्याची कृती
फेसपॅक बनवण्यासाठी एका पॅनमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर अळशीच्या बिया आणि तांदळाचे पीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर या मिश्रणाची पातळ पेस्ट तयार झाल्यानंतर गॅस बंद करून घ्या.तयार केलेली पेस्ट थंड झाल्यानंतर संपूर्ण चेहऱ्याला व्यवस्थित लावून घ्या. त्यानंतर 15 ते 20 मिनिटं ठेवून चेहरा व्यवस्थित पाण्याने धुवून घ्या. तयार केलेला फेसपॅक बंद डब्यात ठेवून तुम्ही पुढचे चार दिवस वापरू शकता.
हे देखील वाचा: स्किन केअरमध्ये Niacinamide चा वापर करून मिळवा चमकदार त्वचा, जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत
अळशीच्या बिया आणि तांदळाचे पीठ वापरण्याचे फायदे