डोळ्यांखालील काळी वर्तुळ कमी करण्यासाठी घरगुती उपाय
धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकदा आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. पण असे न करता आरोग्याची काळजी घेणे फार गरजेचे आहे. अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळ येतात. डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळ घालवण्यासाठी महिला अनेक वेगवेगळे उपाय करतात. मात्र तरीसुद्धा डोळ्यांखालील काळी वर्तुळ निघून जात नाही. फेशियल, क्लिनअप, बाजारात मिळणाऱ्या महागड्या क्रीम्स इत्यादी अनेक गोष्टी लावल्या जातात. तरीसुद्धा डोळ्यांखालील काळेपणा निघून जात नाही. डोळ्यांखाली डार्क सर्कल आल्यानंतर चेहरा पूर्णपणे खराब होऊन जातो. त्यामुळे बाजारात मिळणाऱ्या कोणत्याही क्रिम्सचा वापर कारण्यावेजी ती त्वचेला सूट होईल की नाही, हे तपासून पाहावे.
हे देखील वाचा: पापण्यांवर मस्करा लावल्यानंतर जाड थर दिसतो? मग मस्कारा लावताना ‘या’ चुका करणे टाळा
डोळ्यांखाली काळी वर्तुळ आल्यानंतर चेहरा सतत आजारी असल्यासारखा वाटू लागतो. डोळे आणि चेहरा पूर्णपणे रुक्ष आणि निस्तेज होतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळ घालवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यानंतर डोळ्यांखालील काळी वर्तुळ निघून जाण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया कोणते घरगुती उपाय करावे.
डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळ घालवण्यासाठी बटाट्याचा रस डोळ्यांना लावावा. यामुळे डोळ्यांखालची त्वचा मऊ आणि चमकदार होण्यास मदत होईल. बटाट्यामध्ये असलेले ॲण्टीऑक्सिडंट्स, विटामिन, खनिजे आरोग्यासह त्वचेसाठी सुद्धा खूप चांगले आहेत. बटाट्याचा रस नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून काम करतो. यामुळे त्वचेला पोषण मिळते आणि त्वचा चमकदार आणि सुंदर होते.
बदामाच्या तेलात विटामिन ई, मॅग्नेशियम, फॉस्फरस इत्यादी अनेक गुणकारी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे त्वचा सुंदर आणि चमकदार दिसू लागते. रात्री झोपण्याआधी एक ते दोन थेंब बदामाचे तेल घेऊन डोळ्यांच्या खाली हलक्या हाताने मालिश करा. ज्यामुळे डोळ्यांभोवतीचा काळेपणा कमी होण्यास मदत होईल.
अर्धावाटी दुधामध्ये 6 ते 7 काड्या केशर टाकून 2 तास केशर भिजत ठेवा. त्यानंतर रात्री झोपण्याआधी केशर दूध डोळ्यांखाली काळ्या झालेल्या भागांवर लावा. यामुळे डाग कमी होण्यास मदत होईल. शिवाय केशर दूध डोळ्यांना लावून झाल्यानंतर हलक्या हाताने मालिश करा. यामुळे डाग लवकर निघून जातील.
हे देखील वाचा: या व्हिटामिनच्या कमतरतेमुळे येऊ शकते बहिरेपण