डेड स्किन काढून टाकण्यासाठी घरगुती उपाय
थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा काळवंडलेली आणि निस्तेज होऊन जाते. याशिवाय त्वचेसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. हिवाळ्यामध्ये त्वचेच्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी अन्यथा त्वचा खराब होऊन जाते. वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे आरोग्यासह त्वचा देखील अधिक खराब आणि निस्तेज होऊन जाते. अशावेळी त्वचेला पोषण देण्यासाठी आहारात बदल करून विटामिन सी युक्त पदार्थांचे सेवन करावे. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेले वेगवेगळे प्रॉडक्ट वापरतात. मात्र त्याचा फारसा परिणाम त्वचेवर दिसून येत नाही. यामुळे काहीवेळा त्वचा अधिक निस्तेज आणि खराब झाल्यासारखी वाटते.(फोटो सौजन्य – iStock)
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
त्वचेसंबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी केमिकल ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न करावा. घरगुती पदार्थांमुळे त्वचा सुंदर आणि चमकदार दिसते. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेवर डेड स्किन जमा होते. त्वचेवरील डेड स्किनमुळे त्वचेचा रखरखीत आणि काळवंडलेली दिसू लागते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला त्वचेवरील डेड स्किन काढून टाकण्यासाठी साखरेचा वापर कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे त्वचा सुंदर आणि चमकदार दिसेल.
त्वचेवरील डेड स्किन काढून टाकण्यासाठी वाटीमध्ये लिंबाचा रस घेऊन त्यात थोडीशी साखर टाकून मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण संपूर्ण त्वचेवर लावून हलक्या हाताने मसाज करा. 5 मिनिटं हलक्या हाताने मसाज करून झाल्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे त्वचेवर जमा झालेली डेड स्किन निघून जाईल आणि त्वचा स्वच्छ होईल.
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
वाटीमध्ये तांदळाचे पीठ घेऊन त्यात लिंबाचा रस आणि पिठीसाखर घालून मिक्स करून घ्या. जाडसर मिश्रण तयार झाल्यानंतर संपूर्ण त्वचेवर फेस स्क्रब लावून घ्या. त्यानंतर 5 ते 7 मिनिटं हलक्या हाताने मसाज करून नंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे त्वचेवरील डेड स्किन कमी होईल आणि त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसेल. तांदळाचे पीठ त्वचेसाठी अतिशय प्रभावी आहे. यामध्ये असलेले गुणधर्म त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत करतील.