काखेमध्ये काळेपणा का वाढतो?
शरीरातील सर्वच अवयवांची काळजी घेणे फार गरजेचे आहे. सर्वच महिला शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी सतत काहींना काही करत असतात. मात्र कितीही उपाय केले तरीसुद्धा काखेतील काळेपणा कमी होत नाही. अनेकदा काखेतील काळेपणामुळे महिलांचा आत्मविश्वास कमी होऊन जातो. तर अनेक महिला काखेतील काळेपणामुळे सीव्हील्स कपडे घालण्याचे सोडून देतात. तसेच महिला काखेतील काळेपणा कमी करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले महागडे ब्युटी प्रॉडक्ट वापरतात. पण महागड्या प्रॉडक्टचा वापर करूनसुद्धा काखेतील काळेपणा कमी होत नाही.(फोटो सौजन्य – iStock)
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
काखेतील काळेपणा घालवण्यासाठी अनेक महिला महागड्या क्रीम्स लावतात. मात्र याचा फारसा परिणाम त्वचेवर दिसून येत नाही. त्यामुळे काखेतील काळेपणा घालवण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करू शकता. घरगुती उपाय केल्यामुळे काळेपणा कमी होऊन त्वचा स्वच्छ होईल. घरगुती उपाय त्वचेमधील नैसर्गिक सौदंर्य कायम टिकवून ठेवावा. याशिवाय काखेतील काळेपणा नैसर्गिक असून त्यावर खाज सुटणे हे चांगले नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काखेतील काळेपणा कमी करण्यासाठी काही सोपे उपाय सांगणार आहोत. हे उपाय नक्की करून पहा.
काखेत काळेपणा वाढण्यामागे अनेक कारण आहेत. महिलांच्या शरीरात सतत हार्मोन्सचे संतुलन होत असते. त्यामुळे अनेकदा हार्मोन्सचे असंतुलन झाल्यानंतर काखेमध्ये काळेपणा वाढू लागतो. काखेत वाढलेल्या काळेपणामुळे महिलांचा आत्मविश्वास कमी होऊन जातो. पण शरीरात होणाऱ्या बदलांमुळे त्वचेसंबंधित समस्या वाढू लागतात. काखेत जास्तच काळेपणा वाढल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे.
रेझरचा वापर करून काखेतील केस काढल्यामुळे त्वचा काळी पडते. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने त्वचेवर रेझर फिरवू नये. काखेतील केस काढण्यासाठी वॅक्सिंगचा किंवा घरगुती पदार्थांचा वापर करावा.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त घाम येतो. सतत घाम आल्यामुळे त्वचेवर घाम तसाच साचून राहतो. ज्यामुळे काखेमध्ये काळेपणा वाढण्याची शक्यता असते. अशावेळी त्रिफळा चूर्णसारख्या नैसर्गिक पदार्थांचा वापर करावा. या पदार्थांच्या वापरामुळे काखेतील काळेपणा कमी होईल.
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा