Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केसांवरील चमक वाढवण्यासाठी घरी तयार करा हर्बल हेअर कंडिशनर, केस होतील सॉफ्ट

काही महिला केस लांब आणि चमकदार दिसावे म्हणून बाजारात मिळणारे महागडे प्रॉडक्ट वापरतात. पण केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर केल्याने केस पूर्णपणे कमकुवत आणि निस्तेज होऊन जातात. पण हे सर्व कारण्यापेक्षा योग्य ते हेअर केअर रुटीन फॉलो केले तर केस व्यवस्थित राहतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 01, 2024 | 01:58 PM
हर्बल हेअर कंडिशनर

हर्बल हेअर कंडिशनर

Follow Us
Follow Us:

केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अनेकदा आपण वेगवेगळे उपाय करतो. काही महिला केस लांब आणि चमकदार दिसावे म्हणून बाजारात मिळणारे महागडे प्रॉडक्ट वापरतात. पण केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर केल्याने केस पूर्णपणे कमकुवत आणि निस्तेज होऊन जातात. पण हे सर्व कारण्यापेक्षा योग्य ते हेअर केअर रुटीन फॉलो केले तर केस व्यवस्थित राहतात. आठवड्यातून दोनदा केस स्वच्छ करणे, केसांना तेल लावणे, हेअर मास्क लावणे इत्यादी गोष्टी केल्याने केसांचे आरोग्य निरोगी राहते.

चमकदार आणि लांबसडक केसांसाठी महिला वेगवेगळे उपाय करत असतात. अनेकदा शॅम्पूने केस स्वच्छ केल्यानंतर आपण कंडिशनर लावत नाही. पण कंडिशनर न लावल्याने काही प्रमाणात केस निस्तेज दिसतात. बाजारामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कंडिशनर उपलब्ध आहेत. हे कंडिशनर वापरल्याने केस तेवढ्या पुरते छान दिसतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी हर्बल हेअर कंडिशनर कसे तयार करायची याची सोपी कृती पाहणार आहोत. या हेअर कंडिशनरमुळे तुमच्या केसांचे कोणतेही नुकसान होणार नाही. यामुळे तुमचे केस मऊ आणि चमकदार दिसतील.(फोटो सौजन्य-istock)

पुदिना ग्रीन टी कंडिशनर:

कंडिशनर बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • दोन ग्रीन टी बॅग
  • मूठभर पुदिन्याची पाने
  • एक चमचा जोजोबा ऑइल

कंडिशनर बनवण्याची कृती:

  • कंडिशनर बनवण्यासाठी एका भांड्यात एक ग्लास गरम पाणी करून घ्या. या पाण्यात ग्रीन टी बॅग टाकून गरम करा.
  • त्यानंतर त्यात पुदिन्याची पाने टाका.
  • हे पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करून घ्या. पाणी थंड होण्यासाठी ठेवा.
  • पाणी थंड झाल्यानंतर पुदिन्याचे पाणी गाळून घ्या.
  • नंतर त्यात जोजोबा ऑइल टाकून मिक्स करून घ्या. तयार केलेले पाणी शॅम्पू केल्यानंतर केसांना लावा.

जास्वंद दही कंडिशनर:

साहित्य:

  • 10-12 जास्वंदाची फुले
  • 1 कप दही

कृती:

  • कंडिशनर तयार करण्यासाठीजास्वंदीची पाने बारीक करून घ्या.
  • पाने बारीक करून झाल्यानंतर दह्यामध्ये बारीक केलेली जास्वंदी टाकून मिक्स करून घ्या.
  • हे मिश्रण तयार झाल्यानंतर केसांना आणि स्कॅल्पला लावा.
  • स्कॅल्पला लावून झाल्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
 

टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: Homemade herbal hair conditioner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2024 | 01:58 PM

Topics:  

  • hair care tips

संबंधित बातम्या

३० दिवसांमध्ये केस गळणे होईल पूर्णपणे बंद! केसांच्या मुळांशी लावा ‘या’ पदार्थांचे पाणी, वाढत्या समस्यांपासून मिळेल सुटका
1

३० दिवसांमध्ये केस गळणे होईल पूर्णपणे बंद! केसांच्या मुळांशी लावा ‘या’ पदार्थांचे पाणी, वाढत्या समस्यांपासून मिळेल सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.