Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wedding Budget : लग्नानंतर बिघडणारे बजेट कसे थांबवाल? ‘ही’ सोपी ट्रीक तुमचं नुकसान होऊ देणार नाही

आता तुमचं जर नुकतंच लग्न झालं असेल किंवा तुमचं लग्न होणार असेल तर तुम्ही वेळीच सावध व्हायला पाहिजे. कारण लग्न झाल्यानंतर आपण सर्वाधिक पैसा कुठे वाया घालवतो आणि तो कसा टाळायला पाहिजे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 01, 2026 | 03:53 PM
Wedding Budget :  लग्नानंतर बिघडणारे बजेट कसे थांबवाल? ‘ही’ सोपी ट्रीक तुमचं नुकसान होऊ देणार नाही
Follow Us
Close
Follow Us:
  • लग्नानंतर बिघडणारे बजेट कसे थांबवाल?
  • ‘ही’ सोपी ट्रीक तुमचं नुकसान होऊ देणार नाही
लग्न म्हणजे दोन व्यक्तींचं आयुष्यभरासाठी एकत्र येणं. लग्न करताना आपण खूप उत्साही असतो. तुम्ही ती म्हण तर ऐकलीच असेल. शादी का लड्डू जो खाए वो पचता है और जो ना खाए वो भी पचता है. आता या लग्नानंतर आणि या लड्डूनंतर एक लड्डू मोफत मिळतो तो म्हणजे शून्य बँक बॅलन्स. आता हे कसं? ते सविस्तर जाणून घेऊयात.

खरं तर लग्न झाल्यानंतर सहा महिन्यांचा एक हनीमून पिरियड असतो. या हनीमून पिरियडमध्ये आपण किती पैसे उधळतो हे प्रत्येकाला कळतच असं नाही आणि नंतर मग कळायला लागतं की आपल्या खिशाला किती कात्री बसते ते कळतं. म्हणूनच लग्नानंतर बिघडणारे बजेट कसं वाचवता येईल याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.

आता तुमचं जर नुकतंच लग्न झालं असेल किंवा तुमचं लग्न होणार असेल तर तुम्ही वेळीच सावध व्हायला पाहिजे. कारण लग्न झाल्यानंतर आपण सर्वाधिक पैसा कुठे वाया घालवतो आणि तो कसा टाळायला पाहिजे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

 

शॉपिंग

एप्रिल, मे हा लगिनसराईचा सिझन असतो. जर तुमचं ही लग्न ठरलंय किंवा ठरण्यात जमा आहे तर ही माहिती खास तुमच्यासाठी. लग्न ठरल्यानंतर सगळ्यात पहिला खर्च म्हणजे शॉपिंग. कारण लग्न ठरलं म्हणजे कपडे हवेत. मग ब्रँडेड सूट पाहिजे, ब्रँडेड लेहंगा पाहिजे आणि असे बरेच कपडे खरेदी करून कपाटामध्ये भरले जातात. सहा सात महिन्या नंतर जेव्हा आपण कपाट उघडतो तेव्हा लक्षात येतं की अरे यातले अर्धे कपडे तर आपण वापरलेच नाहीयेत. त्यामुळे जेव्हा तुमचं लग्न ठरतंय तेव्हा तुम्ही त्याची नीट योजना आखून खरेदी पााहिजे त्या वस्तू खरेदी करा. आजकाल सोशल मीडिया म्हणजे जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे . कारण लग्न केल्यानंतर इंस्टाग्राम रील आणि फेसबुकवर फोटो टाकण्याची खूप घाई झालेली असते. त्यासाठी इंटरनॅशनल ट्रिप करायची असते आणि ही इंटरनॅशनल ट्रिप करण्यासाठी बरेचदा कर्ज काढलं जातं किंवा क्रेडिट कार्डचा वापर केला जातो. पण हा असा दिखावा करणं टाळा.तुमचं बजेट काय आहे त्यानुसारच तुमच्या हनीमून ट्रिपचं प्लॅनिंग करा.

Wedding Plan : लग्न करताना बजेट कसा असावा ? काय गोष्टी लक्षात …

इंटिरिअल

तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्नानंतर आपल्याला वेगळ्या घरात राहायला जायचं असतं. मग आपलं घर सजवायचं. या नादामध्ये अनेक अनावश्यक वस्तूंची खरेदी केली जाते. मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स असू देत किंवा महागडी भांडी असू देत. तुम्हाला नवीन घरात राहायला जायचं आहे, वेगळ्या वस्तू या लागतातच पण कोणत्या वस्तू हव्यात त्याचंही एक बजेट आखणं महत्वाचं आहे. त्यानुसार खरेदी करणं फायद्याचं ठरेल.

आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लग्नानंतर साधारण सहा महिने घरातले गेट टू गेेदर किंवा पार्टी काही संपत नसतात. मग अशा वेळेला स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक होत नाही. त्यामुळे पार्ट्यांवर खर्च अधिक प्रमाणात होतो. आता आपलं हे लग्नानंतर बजेट बिघडण्यापासून कसं वाचायचंय ते ही माहित असणं गरजेचं आहे. यासाठी एक बजेट डायरी तयार करा. महिन्याच्या सुरुवातीलाच ठरवा की किती खर्च करायचा आणि किती बचत करायची. तुमच्या गरजा काय आहेत ते ठरवा. कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी स्वतःला विचारा. मला याची खरोखर गरज आहे की मला फक्त ती हवी आहे. दिखाऊ वस्तूंवर पैसे घालवण्याऐवजी चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करा आणि आपलं भविष्य सुरक्षित करा.

लहान रूमला द्या मोठा लुक! लहान खोल्यांसाठी मॉडर्न बुकशेल्फ; स्टाईल आणि स्पेस सेव्हिंग आयडिया

Web Title: How do you stop your financial budget from deteriorating after marriage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 03:52 PM

Topics:  

  • Wedding Season
  • wedding tips

संबंधित बातम्या

Ukhane For New Bride: सोन्याची नथ आणि हिरवी साडी…! लग्नसोहळ्यात नववधूसाठी भन्नाट उखाणे, शब्दांनीच जिंकाल साऱ्यांचे मन
1

Ukhane For New Bride: सोन्याची नथ आणि हिरवी साडी…! लग्नसोहळ्यात नववधूसाठी भन्नाट उखाणे, शब्दांनीच जिंकाल साऱ्यांचे मन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.