Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

chattrapati shivaji maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांना किती पत्नी होत्या? जाणून घ्या त्यांनी नावे

छत्रपती शिवाजी महाराज यांना आठ पत्नी होत्या. मात्र त्यांचा उल्लेख फारसा कुठेही करण्यात आलेला नाही. म्हणून आज आम्ही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नीनं विषयी सविस्तर माहिती सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 15, 2025 | 02:48 PM
छत्रपती शिवाजी महाराजांना किती पत्नी होत्या?

छत्रपती शिवाजी महाराजांना किती पत्नी होत्या?

Follow Us
Close
Follow Us:

दरवर्षी 19 फेब्रुवारीला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज हे वैभव, शौर्य, दया आणि औदार्य याचे प्रतीक होते. शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळील वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर झाला. तसेच शिवाजी महाराजांचे नाव शिवाई या देवतेवरून ठेवण्यात आले. एका आख्यायिकेत सांगितल्यानुसार, शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती, त्यामुळेच या मुलाचे नाव ‘शिवाजी’ ठेवले गेले. शिवरायांचे वडील शहाजीराजे भोंसले हे मराठा सेनापती होते, ज्यांनी दख्खनच्या सल्तनतची सेवा केली. तसेच त्यांच्या आईचे नाव जिजाबाई आहे, ज्या सिंदखेडच्या लखुजी जाधवरावांच्या कन्या होत्या. शिवाजी महाराज हे मराठा कुटुंबातील आणि भोसले कुळातील राजे होते.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

World Radio Day: रेडिओ म्हणजे आवाजाच्या जादूने करिअर आणि प्रसिद्धीचे नवे द्वार उघडणारे माध्यम

महाराष्ट्र राज्यात सगळीकडे मोठ्या आनंद आणि उत्साहात शिवजयंती साजरा केली जाते. 19 फेब्रुवारीला राज्यातील अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याशिवाय भव्य मिरवणुका, मराठ्यांचा समृद्ध आणि व्यापक सांस्कृतिक वारसा जपला जातो. आज आम्ही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांना किती पत्नी होत्या? त्यांची नावे काय? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठ पत्नींची सविस्तर माहिती:

निबांळ्कर घराण्यातील सईबाई निंबाळकर:

पुण्यातील लाला महालात 16 मे 1640 रोजी बालपणीच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला. त्या शिवरायांच्या प्रथम पत्नी होत्या. फलटणचे मुधोजीराजे निंबाळकर हे सईबाईंचे वडील होते.

मोहिते घराण्यातील सोयराबाई मोहिते:

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव सोयराबाई मोहिते असे होते. छत्रपती राजाराम राजे यांच्या त्या आई होत्या. याशिवाय मराठा साम्राज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या सोयराबाई बहीण होत्या.

पालकर घराण्यातील पुतळाबाई पालकर:

छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिसऱ्या पत्नी पुतळाबाई पालकर या बाजी प्रभू प्रधान यांच्या कन्या होत्या. राजांच्या देहावसाननंतर या त्याकाळी सती म्हणून त्यांच्या चितेवर गेल्या होत्या.

गायकवाड घराण्यातील सकवारबाई गायकवाड:

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सकवारबाई गायकवाड या नांदोजी राव गायकवाड यांच्या कन्या होत्या. सकवारबाई गायकवाड यांचा विवाह शिवाजी महाराजांसोबत 1657 मध्ये झाला.

शिर्के घराण्यातील सगुणाबाई शिर्के:

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाचव्या पत्नीचे नाव सगुणाबाई शिर्के असे होते.

जाधव घराण्यातील काशीबाई जाधव:

जाधव घराण्यातील काशीबाई जाधव या शिवाजी महाराजांच्या सहाव्या पत्नी होत्या. त्यांचा विवाह सोहळा 7 एप्रिल 1657 रोजी झाला. काशीबाई या जिजामातांच्या जाधव कुटुंबातील होत्या आणि त्या शंभूसिंह बांदल यांच्या बहिणी होत्या.

विचारें घराण्यातील लक्ष्मीबाई विचारें:

विचारें घराण्यातील लक्ष्मीबाई विचारें या शिवाजी महाराजांच्या सातव्या पत्नी होत्या.

काय आहे ‘Illuminati’? त्रिकोणामध्ये असलेल्या एका डोळ्याचे गूढ काय? जाणून घ्या

इंगळे घराण्यातील गुणवंताबाई इंगळे:

गुणवंताबाई इंगळे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठव्या पत्नी होत्या. 15 एप्रिल रोजी भोसल्यांशी सोयरिक होऊन गुणवंताबाई शिवरायांच्या पत्नी झाल्या झाल्या, असा उल्लेख जेधे शकावलीमध्ये आहे.

Web Title: How many wife did chhatrapati shivaji maharaj have learn their names

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2025 | 03:40 PM

Topics:  

  • chatrapati Shivaji Maharaj
  • chattrapati shivaji maharaj
  • shivjayanti

संबंधित बातम्या

Kalyan News :  इतिहासप्रेमींसाठी पर्वणी; गणेशोत्सावाच्या निमित्ताने शहरात शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन
1

Kalyan News : इतिहासप्रेमींसाठी पर्वणी; गणेशोत्सावाच्या निमित्ताने शहरात शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन

Thane News : “खालिद का शिवाजी “चित्रपटाचा सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाने नोंदवला निषेध
2

Thane News : “खालिद का शिवाजी “चित्रपटाचा सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाने नोंदवला निषेध

Khalid Ka Shivaji: ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाच्या सेन्सॉर प्रमाणपत्राची पुनर्तपासणी, महाराष्ट्र सरकारची केंद्राकडे मागणी
3

Khalid Ka Shivaji: ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाच्या सेन्सॉर प्रमाणपत्राची पुनर्तपासणी, महाराष्ट्र सरकारची केंद्राकडे मागणी

Satara : “मी मुस्लिम, पण शिवरायांचा मावळा”; सादिक शेख यांनी काय केलं, पाहा व्हिडीओ
4

Satara : “मी मुस्लिम, पण शिवरायांचा मावळा”; सादिक शेख यांनी काय केलं, पाहा व्हिडीओ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.