पाणी प्यायल्याने आरोग्याला होणारे फायदे
दिवसभरात किती पाणी प्यावे? हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. भरपूर पाणी प्यायल्याने शरीरातील अनेक आजार बरे होण्यास मदत होते. जास्त पाणी पिल्याने शरीर डिटॉक्स राहून त्वचा सुधारते. त्वचेचा रंग सुधारण्यासाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी रोज 8 ग्लास पाणी प्यावे. दिवसभरात किती पाणी प्यावे, यासाठी सोशल मीडिया आणि इतर ठिकाणी बरीच माहिती दिली जाते.शरीर निरोगी राहण्यासाठी सतत पाणी पिणे फार महत्वाचे आहे. पण जास्त पाणी पिणे हे सुद्धा शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दिवसभरात नेमके किती पाणी प्यावे? पाणी प्यायल्याने आरोग्याला काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
पाणी प्यायल्याने आरोग्याला होणारे फायदे
शरीरामध्ये 50 ते 70 टक्के वजन हे पाण्यामुळे होते. पाणी प्यायल्याने त्वचा हायड्रेट राहून त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहतो. त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहण्यासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी भरपूर पाणी प्यावे. पाणी प्याल्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. तसेच आरोग्यसंबंधित आजार दूर होतात. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करणे फार आवश्यक आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे पेशींमधील द्रवपदार्थ नष्ट होऊन जातात, त्यामुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते.पाणी प्यायल्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहते. प्रत्येक शारीरिक कार्यात पाण्याचा वापर करणे गरजेचे आहे.
हे देखील वाचा: हाडांमधील ठिसूळपणा दूर करण्यासाठी आहारात करा ‘या’ विटामिन B 12 Vitamin B12युक्त पदार्थांचा समावेश
पाणी प्यायल्याने आरोग्याला होणारे फायदे
प्रत्येक व्यक्तीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, वैद्यकीय परिस्थिती वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला पाण्याची गरज ही वेगवेगळी आहे. एसीमध्ये बसलेल्या व्यक्तीपेक्षा जास्त वेळ उन्हामध्ये फिरलेल्या व्यक्तीला जास्त पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपली शारीरिक आणि वैद्यकीय स्थिती पाहून किती पाणी प्यावे याचे प्रमाण ठरवावे. पुरुषांनी दररोज 3.7 लिटर द्रवपदार्थांचे सेवन केले पाहिजे तर महिलांनी 2.7 लिटर द्रवपदार्थांचे सेवन केले पाहिजे.